• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. gautam adani to retire at 70 and leave it all to these four successors spl

Photos : उद्योगपती गौतम अदाणी ७० व्या वर्षी होणार निवृत्त, कोण होणार त्यांचा उत्तराधिकारी? जाणून घ्या

Gautam Adani Retirement: गौतम अदाणी यांनी वयाच्या ७० व्या वर्षी निवृत्ती घेण्याची योजना आखली आहे. ज्या लोकांना उत्तराधिकारी बनवले जाणार आहे, त्या लोकांकडे आधीच अदाणी समूहाच्या विविध खात्यांची जबाबदारी आहे.

Updated: August 6, 2024 17:21 IST
Follow Us
  • Gautam Adani's retirement
    1/9

    अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांच्या निवृत्तीबाबत चर्चा सुरू झाली आहे. गौतम अदाणी यांनी वयाच्या ७० व्या वर्षी निवृत्त होण्याची योजना आखली आहे, सध्या ते ६२ वर्षांचे आहेत. ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी निवृत्तीच्या नियोजनाबद्दल सांगितले आहे.

  • 2/9

    खरं तर, मुलाखतीत निवृत्तीच्या प्रश्नाला उत्तर देताना, अदाणी म्हणाले की ते वयवर्ष ७० पर्यंत काम करतील आणि २०३० च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांचे संपूर्ण काम कंपनीच्या नवीन मालकाकडे सोपवतील. (REUTERS PHOTO)

  • 3/9

    गौतम अदाणी यांनी त्यांच्या निवृत्तीबद्दल आणि उत्तराधिकारीबद्दल बोलण्याची ही पहिलीच वेळ आहे. वयाच्या ७० व्या वर्षी निवृत्तीनंतर अदाणी समूहाची कमान आपल्या मुलांकडे आणि पुतण्यांकडे सोपवण्याचा त्यांचा विचार आहे.

  • 4/9

    गौतम अदाणी निवृत्त झाल्यावर, त्यांचे चार उत्तराधिकारी – मुले, करण व जीत आणि पुतणे, प्रणव आणि सागर हे फॅमिली ट्रस्टचे लाभार्थी होतील.

  • 5/9

    अदाणी समूहाच्या वेबसाइटनुसार, गौतम अदाणी यांचा मोठा मुलगा करण अदाणी, अदाणी पोर्ट्सचा व्यवस्थापकीय संचालक आहे, तर त्यांचा धाकटा मुलगा जीत अदाणी हा अदाणी एयरपोर्ट्सlचा संचालक आहे.

  • 6/9

    वेबसाइटनुसार, प्रणव अदाणी हे अदाणी एंटरप्रायझेसचे संचालक आहेत आणि सागर अदाणी हे अदाणी ग्रीन एनर्जीचे कार्यकारी संचालक आहेत. प्रणव आणि करण हे अध्यक्षपदासाठी सर्वात मोठे दावेदार असल्याचे ब्लूमबर्गच्या अहवालात म्हटले आहे.

  • 7/9

    गौतम अदाणी म्हणाले, “व्यावसायात स्थिरतेसाठी उत्तराधिकारी खूप महत्त्वाचा आहे. मी हा पर्याय दुसऱ्या पिढीवर सोडला आहे. बदल हळूहळूआणि तितक्याच पद्धतशीरपणे व्हायला हवा.”

  • 8/9

    अदाणी समूहाच्या पोर्टफोलिओबद्दल बोलायचे तर, त्यात १० सूचीबद्ध कंपन्या आहेत, ज्यांचे एकूण मार्केट कॅपीटल सुमारे २१.३ हजार कोटी डॉलर आहे. समूहाचा व्यवसाय कोळसा व्यापार, खाणकाम, लॉजिस्टिक्स, वीज निर्मिती आणि वितरणाचा आहे. अदानी समूहाने सिमेंट उद्योगातही प्रवेश केला आहे. (फोटो: एक्सप्रेस संग्रह)

  • 9/9

    हेही पाहा: आजोबा, वडील आणि भाऊ होते बॅडमिंटनपटू, २२ व्या वर्षी लक्ष्य सेन करोडपती, जाणून घ्या शै…

TOPICS
अदाणी ग्रुपAdani Groupगौतम अदाणीGautam Adaniमराठी बातम्याMarathi News

Web Title: Gautam adani to retire at 70 and leave it all to these four successors spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.