-
काळानुरूप महागाईही वाढत आहे. महागाई हा नेहमीच मोठा मुद्दा असतो. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला एका अनोख्या भाजीबद्दल सांगणार आहोत जिच्या किमतीत तुम्ही आयफोन किंवा जाड सोन्याची चेन खरेदी कराल.
-
जगभरात अशा अनेक प्रकारच्या भाज्या आढळतात, ज्यांच्याबद्दल कदाचित अनेकांना माहिती नसते, परंतु या भाज्या आपल्या आरोग्याच्या दृष्ठीने खूप फायदेशीर आहेत. दरम्यान ‘हॉप शूट्स’ नावाची एक भाजी आहे.
-
हॉप शूट्स ही सर्वात महाग आणि मौल्यवान भाजी असल्याचे म्हटले जाते. बाजारात हॉप शूट्स भाजीची किंमत 85 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत आहे. ती इतकी महाग असल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.
-
हॉप शूट जगातील सर्वात महाग भाजीचे पिक आहे. वास्तविक, हे पिक शेतीत वाढवण्यासाठी विशेष हवामान आवश्यक आहे. कोणत्याही ठिकाणी हे पिक वाढू शकत नाही. या हॉप शूट वनस्पतीची लागवड आणि देखभाल करण्यासाठी खूप पैसा खर्च होतो.
-
ही भाजी एक पर्वतीय वनस्पती आहे. अमेरिका, युरोप, कॅनडा, चीन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह 15 देशांमध्ये तिचे उत्पादन केले जाते. मात्र भारतात हॉप शूट्सची लागवड केली जात नाही. हिमाचलमध्ये तिची निर्मिती करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु तो यशस्वी झाला नाही.
-
हॉप शूट ही हिरवी भाजी असते. या भाजीला शंकूच्या आकाराची फुले असतात. यामध्ये स्ट्रोबाईल्स असतात. या फुलांचा वापर बिअरमधील गोडपणा संतुलित करण्यासाठी आणि चव वाढवण्यासाठी केला जातो. तर या पिकाच्या डहाळ्या आणि पानांची भाजी आणि लोणचेही केले जाते.
-
ही भाजी 2000 वर्षांहून अधिक काळ औषधी म्हणून वापरली जात आहे. प्राचीन काळी, कुष्ठरोग, पायाची दुर्गंधी, बद्धकोष्ठता बरे करण्यासाठी आणि रक्त शुद्ध करण्यासाठी हॉप शूट्स या वनस्पतीचा वापर होत असे.
-
मानसिक ताणतणाव, अस्वस्थता, चिडचिड आणि निद्रानाश यापासून आराम मिळवून देण्यासाठीही ही भाजी उपयुक्त आहे. त्याच वेळी, एका वैद्यकीय अहवालात असेही समोर आले आहे की हॉप शूट्सच्या सेवनाने शरीरात क्षयरोग (टीबी) विरूद्ध अँटीबॉडीज देखील तयार होतात. यासोबतच कॅन्सरच्या रुग्णांसाठीही हे खूप फायदेशीर मानले जाते.
(Photos Source: Pexels and Freepik)
Photos : ‘ही’ आहे जगातील सर्वात महागडी भाजी, तिच्या किमतीत आयफोन खरेदी करता येऊ शकतो
World’s Most Expensive Vegetable: या भाजीचे पिक विशेष हवामानातच उगवते आणि औषधी बनवणे तसेच ख्ण्यासाठीही ही भाजी वापरली जाते.
Web Title: World most expensive vegetable hop shoots costlier than a iphone spl