-
आजच्या डिजिटल जगात, सोशल मीडियाचा प्रभाव वाढतच चालला आहे, विशेषत: जनरेशन झेड. या पिढीच्या सोशल मीडिया वापराच्या सवयींवरून हे दिसून येते की कोणते प्लॅटफॉर्म त्यांना सर्वात जास्त आकर्षित करतात आणि ते त्यांच्या दैनंदिन जीवनात ते कसे वापरत आहेत.
-
प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार, जगभरातील १८ ते २९ वयोगटातील युवा पिढीच्या मनावर कोणते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म राज्य करत आहेत ते जाणून घेऊया.
-
YouTube – जगभरातील ९३ टक्के युवा पिढीला यूट्यूब प्लॅटफॉर्म आवडतो.
-
इंस्टाग्राम – ७८ टक्के युवा पिढी इंस्टाग्रामचा वापर करते.
-
फेसबुक – ६७ टक्के नवी पिढी फेसबुक प्लॅटफॉर्मवर आहे.
-
स्नॅपचॅट – ६५ टक्के तरुण पिढी स्नॅपचॅटवर आहे.
-
टिकटॉक – जगभरातील ६२ टक्के जनरेशन झेड सध्या टिकटॉकच्या प्रेमात आहे. भारतात मात्र या ॲपवर बंदी आहे.
-
पिनटेरेस्ट – ४५ टक्के युवकांकडुन पिनटेरेस्ट या अॅपचा वापर त्यांच्या दैनंदिन आयुष्यात केला जातो.
-
रेडिट – ४४ टक्के रेडिटचा वापर करतात.
-
एक्स/ट्विटर – एकूण २२ टक्के इतकी युवा पिढी ही एक्स या प्लॅटफॉर्मचा त्यांच्या जीवनात वापर करत आहे.
-
लिंक्डइन – ३२ टक्के युवा पिढी ही लिंक्डइन या प्लॅटफॉर्मचा त्यांच्या जीवनात वापर करत आहे.
-
व्हॉट्सॲप – ३२ टक्के युवा पिढीला व्हॉट्सॲप आवडते.
-
बी रिअल – १२ टक्के जनरेशन झेडचा कल बी रिअल या ॲपच्या वापराकडे आहे.
दरम्यान, जेन-झी म्हणजे जनरेशन झेड. साधारण १९९६-९७ ते २०१२-१५ या दरम्यान ज्यांचा जन्म झाला असेल त्यांच्या पिढीला, जनरेशन झेड किंवा ‘जेन-झी’ असे म्हटले जाते.
(Photos Source: Pexels)
हेही वाचा- Photos : पावसाळा संपण्यापूर्वी ‘या’ ९ सुंदर ठिकाणांना जरुर भेट द्या, निसर्गाच्या कुशीत शांततेची अनुभूती घ्या
Gen Z : यूट्यूब, इन्स्टाग्राम की व्हॉट्सॲप, ‘जेन-झी’चा आवडता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कोणता आहे?
Gen Z favorite social media platforms: आजच्या डिजिटल जगात, सोशल मीडियाने तरुण पिढीची जीवनशैली पूर्णपणे बदलून टाकली आहे. प्यू रिसर्च सेंटरने प्रसिद्ध केलेल्या अहवालावरून आजचे तरुण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा कसा वापर करतात याची कल्पना येते.
Web Title: What are gen z favorite social media platforms spl