-
जगातील चौथ्या क्रमांकाचे रेल्वेचे जाळे भारतात आहे. जे दररोज दोन कोटींहून अधिक लोकांना प्रवास सुविधा पुरवते.
-
राजधानी, शताब्दी, दुरांतो, वंदे भारत मेल एक्स्प्रेस आणि पॅसेंजर यासारख्या गाड्यांसह देशभरात दररोज १३,४५२ हून अधिक ट्रेन धावतात.
-
या गाड्यांद्वारे भारतीय रेल्वेला चांगली कमाई होते. पण तुम्हाला माहिती आहे का की भारतीय रेल्वेला सर्वात जास्त नफा कोणत्या ट्रेनपासून मिळतो?
-
तुम्ही विचार करत असाल की भारतीय रेल्वेसाठी सर्वात फायदेशीर गाड्या वंदे भारत एक्सप्रेस किंवा शताब्दी एक्सप्रेस असतील.
-
पण आम्ही तुम्हाला सांगतो, भारतीय रेल्वेची सर्वात फायदेशीर ट्रेन ही शताब्दी एक्स्प्रेस किंवा वंदे भारत एक्सप्रेस नसून बंगळुरू राजधानी एक्सप्रेस आहे.
-
हजरत निजामुद्दीन ते केएसआर बेंगळुरू दरम्यान धावणारी ही ट्रेन आहे. या ट्रेनमधून भारतीय रेल्वेला सर्वाधिक महसूल मिळतो.
-
Indiarailinfo.com नुसार, आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये, बंगलोर राजधानी एक्सप्रेसने १,७६,०६,६६,३३९ रुपये कमावले होते.
-
(Photos Source: indiarailinfo.com)
Indian Rail : शताब्दी किंवा वंदे भारत नाही, ‘ही’ ट्रेन भारतीय रेल्वेला सर्वाधिक नफा मिळवून देते, वर्षाला कमावते कोट्यवधी रुपये
Highest Earning Train in India: भारताचे रेल्वे नेटवर्क हे जगातील सर्वात मोठे नेटवर्क आहे, जे दररोज दोन कोटींहून अधिक लोकांना प्रवास सुविधा पुरवते. पण भारतीय रेल्वेला सर्वात जास्त नफा कोणती ट्रेन देते हे तुम्हाला माहिती आहे का?
Web Title: Do you know bangalore rajdhani express which travels from hazrat nizamuddin to ksr bengaluru generates top revenue for indian railways spl