• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. 10 most expensive fruits in the world spl

Expensive Fruits : जगातील सर्वात महागडी १० फळं कोणती?, किंमत वाचून व्हाल अवाक!

Worlds 10 most expensive fruits: जगातील १० सर्वात महाग फळांपैकी ८ फक्त एकाच देशात आढळतात. सर्वात महाग फळाची किंमत इतकी आहे की आपण अंदाज देखील लावू शकत नाही.

Updated: September 18, 2024 17:35 IST
Follow Us
  • the most expensive fruits in the world
    1/12

    साधारणपणे, आपण आपल्या घरात वापरत असलेल्या फळांची किंमत जास्तीत जास्त २०० रुपये किंवा ३०० रुपये प्रति किलो आहे. सफरचंद, डाळिंब, आंबा, द्राक्षे, खरबूज, पेरू, नाशपाती आणि इतर अनेक फळांना फारशी किंमत नसते. पण जगात अशी अनेक फळे आहेत जी इतकी महाग आहेत की ती विकत घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्यात नाही. चला जाणून घेऊया जगातील १० सर्वात महाग फळे कोणती आहेत? (Photo: Pexels)

  • 2/12

    १०- बुद्धा नाशपाती (Buddha Shaped Pears)
    जगातील सर्वात महाग फळांपैकी एक म्हणजे चीनचे बुद्ध आकाराचे नाशपाती. हे बुद्धाच्या चेहऱ्याच्या आकारात असलेल्या प्लास्टिकच्या साच्यात ठेवले जाते. बाजारात या फळाची किंमत ७०० रुपये आहे. (Photo: Pinterest)

  • 3/12

    ९- सेकाई इची सफरचंद (Sekai Ichi Apples)
    सेकाई इची सफरचंद फक्त जपानमध्येच आढळतात. सेकाई इची या जातीच्या एका सफरचंदाची किंमत सुमारे दोन हजार रुपये आहे. (Photo: Freepik)

  • 4/12

    ८- डेकोपोन मोसंबी (Dekopon Citrus)
    डेकोपोन लिंबूवर्गीय फळाची लागवड पहिल्यांदा जपानमध्ये १९७२ मध्ये झाली. सहा डेकॅपॉन मोसंबीची किंमत सुमारे सहा हजार रुपये आहे. (Photo: Freepik)

  • 5/12

    ७- सेंबिकिया स्ट्रॉबेरी (Sembikiya Queen Strawberries)
    जगातील १० सर्वात महाग फळांपैकी बहुतेक फळं फक्त जपानमध्ये आढळतात. सेम्बिया क्वीन स्ट्रॉबेरी देखील फक्त जपानमध्ये आढळते. acitgroup.com.au वेबसाइटनुसार, एका बॉक्समध्ये १२ स्ट्रॉबेरी असतात ज्यांची किंमत सुमारे ७,११५ रुपये इतकी आहे. (Photo: Freepik)

  • 6/12

    ६- चौरस टरबूज (Square Watermelon)
    या चौरस आकाराच्या टरबूजाची किंमत सुमारे २०० यूएस डॉलर आहे. तसेच या टरबूजाला ८०० डॅालर्स मध्ये विकले गेले आहे. जर आपण ८०० डॉलर भारतीय रुपयात रूपांतरित केले तर ते ६६,९७३ रुपये होईल. हे टरबूजही फक्त जपानमध्येच आढळते. (Photo: Amazon Indian)

  • 7/12

    ५- मियाझाकी आंबा (Miyazaki Mango)
    मियाझाकी आंबा फक्त जपानमध्येच मिळतो. परदेशात या आंब्याची किंमत २ ते ३ लाख रुपये प्रतिकिलो आहे. (Photo: Pexels)

  • 8/12

    ४- डेन्सुक टरबूज (Densuke Watermelon)
    डेन्सुक हे एक दुर्मिळ जातीेचे टरबूज आहे ज्याचा रंग काळा आहे. हे टरबूजही फक्त जपानमध्येच पिकवले जाते. foodrepublic.com वेबसाइटनुसार, हे टरबूज २००८ मध्ये ६,१०० US डॉलर म्हणजे सुमारे ५ लाख रुपयांना विकले गेले होते. (Photo: Freepik)

  • 9/12

    ३- रुबी रोमन द्राक्षे (Ruby Roman Grapes)
    सामान्यपणे द्राक्षांची किंमत २०० रुपये किंवा ३०० रुपये किलोपर्यंत असू शकते, परंतु रुबी रोमन द्राक्षांची किंमत इतकी आहे की सामान्य माणूस ते खरेदी करू शकत नाही. २००८ मध्ये ७०० ग्रॅम रुबी रोमन द्राक्षे ८,४०० डॉलर म्हणजे सुमारे ७ लाख रुपयांना विकली गेली. (Photo: Freepik)

  • 10/12

    २- हेलिगन अननस (Lost Gardens of Heligan Pineapple)
    इंग्लंडचे लॉस्ट गार्डन ऑफ हेलिगन अननस हे देखील जगातील सर्वात महाग फळांपैकी एक आहे. delish.com वेबसाइटनुसार, त्याची किंमत १ लाख ते १२ लाख रुपयांपर्यंत आहे. हे अननस पिकवण्यासाठी एक ते दोन लाख रुपये खर्च येतो. (Photo: Freepik)

  • 11/12

    १- युबरी किंग खरबूज (Yubari King Melon)
    जगातील सर्वात महाग फळ म्हणजे युबरी खरबूज (युबरी किंग) हे जपानमधील होक्काइडो बेटावर पिकवले जाते. एका खरबूजाची किंमत १० लाख ते २४ लाखांपर्यंत आहे. एका लिलावात युबरी खरबूजाची एक खाप २४ लाखांहून अधिक रुपयांना विकली गेली होती. (Photo: Freepik)

  • 12/12

    हेही वाचा- Photos : अभिनेत्री करिश्मा तन्ना जिम आउटफिटमध्ये दिसतेय खूपच कूल, कर्वी फिगर पाहून व्…

TOPICS
ट्रेंडिंगTrendingमराठी बातम्याMarathi News

Web Title: 10 most expensive fruits in the world spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.