-
राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. प्रदीर्घ काळानंतर त्यांनी काँग्रेस सोडून नुकतेच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. बाबा सिद्दीकी हे केवळ प्रसिद्ध नेतेच नव्हते तर ते चित्रपटसृष्टीतही खूप प्रसिद्ध होते. दरवर्षी त्यांच्या इफ्तार पार्टीला संजय दत्त, सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान यांच्यासह बॉलिवूडचे इतर बडे कलाकार उपस्थित असायचे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
सध्या बाबा सिद्दीकी यांच्या घरी राजकारणी आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा गर्दी जमली आहे. दरम्यान लॉरेन्स बिश्नोई टोळीने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
बाबा सिद्दीकी हे खूप श्रीमंत नेते होते आणि त्यांच्याकडे मुंबईपासून राजस्थानपर्यंत अनेक महागड्या मालमत्ता होत्या. त्यांनी किती मालमत्ता मागे सोडली ते जाणून घेऊयात. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
myneta.info वेबसाइटनुसार, बाबा सिद्दीकी यांच्या पत्नीच्या नावावर राजस्थानमध्ये एक शेतजमीन आहे जिची किंमत १ लाख ८५ हजार रुपये आहे. बाबा सिद्दीकी यांनी आपला बहुतांश पैसा येथे गुंतवला आहे. (फोटो: पीटीआय)
-
मुंबईतील वांद्रे येथे बाबा सिद्दीकी यांच्या नावावर १ आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर २ व्यावसायिक इमारती आहेत, ज्यांची किंमत ६ कोटी ७१ लाख रुपये आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
राष्ट्रवादीच्या नेत्याचा बहुतांश पैसा निवासी घरांमध्ये गुंतवला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या नावावर मुंबईतील वांद्रे येथे दोन निवासी घरे असून त्यांची किंमत १८ कोटी रुपये आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
त्यांच्या पत्नीच्या नावावर मुंबईत ४ घरे असून त्यांची किंमत १४ कोटी रुपये आहे. एकंदरीत बाबा सिद्दीकी आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर ३३ कोटी ४४ लाख रुपयांची घरं आहेत. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
UAE मधील DFO या प्रसिद्ध टॉवरमध्ये बाबा सिद्दीकी यांचा ५० टक्के बेनिफिशियल इंटरेस्ट आहे, ज्याची किंमत सध्या ६ कोटी ३३ लाख रुपये आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
बाबा सिद्दीकी होते कोट्यधीश; मुंबई, राजस्थान ते UAE मधील तब्बल ‘इतकी’ मालमत्ता सोडली मागे!
How many properties did Baba Siddique leave behind: बाबा सिद्दिकी हे खूप श्रीमंत नेते होते, त्यांच्याकडे देशात अनेक मालमत्ता होत्या. जाणून घेऊया बाबा सिद्दीकी यांनी किती संपत्ती मागे सोडली.
Web Title: How many properties did baba siddique leave behind his empire spread from mumbai to rajasthan spl