Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. how much tax will those who earn from youtube have to pay know the easy calculation spl

YouTube क्रिएटर्सना त्यांच्या कमाईवर आता किती टॅक्स भरावा लागणार, वाचा नव्या कर प्रणालीत काय सांगण्यात आलंय?

YouTube Creators, YouTubers Tax Information : भारतातील YouTube क्रिएटर्ससाठी कर नियम आणि ITR भरण्यासंदर्भात काही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत, ज्या सर्व युट्यूबर्ससाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाच आहे.

Updated: October 16, 2024 13:49 IST
Follow Us
  • youtube tax information,youtube tax changes,tax information youtube adsense,youtube tax,youtube charges,youtube earning,youtube earnings
    1/12

    भारतातील YouTube क्रिएटर्ससाठी कर नियम आणि ITR भरण्यासंदर्भात काही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत, ज्या सर्व युट्यूबर्ससाठी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. (Photo: Pexels)

  • 2/12

    १) आयकर नियम
    भारतातील आयकर नियम सर्व करदात्यांसाठी समान आहेत, मग ते नोकरदार असोत किंवा फ्रीलांसर असोत. कृषी उत्पन्न वगळता, इतर सर्वांना त्यांच्या उत्पन्नावर कर भरावा लागतो. (Photo: Pexels)

  • 3/12

    २) जुन्या कर प्रणालीचे प्रयोजन
    सध्याच्या कर प्रणालीनुसार, जुन्या कर प्रणालीमध्ये ५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागत नव्हता, तर नवीन कर प्रणालीमध्ये ७ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त ठेवण्यात आले आहे. (Photo: Pexels)

  • 4/12

    कर प्रणाली निवडताना, यूट्यूबर्सना त्यांच्या उत्पन्न किती आणि खर्च किती आहेत हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. या आधारावर ते कर भरण्याच्या प्रक्रियेत सामाविष्ट होतील. (Photo: Pexels)

  • 5/12

    ३) ITR-1 किंवा ITR-2 फॉर्म काय असतो?
    YouTube यूट्यूबर्सना ITR-1 किंवा ITR-2 फॉर्म वापरण्याची गरज नाही. कारण त्यांच्या कमाईचा पगार म्हणून विचार केला जात नाही. त्यांचे उत्पन्न फ्रीलांसर किंवा व्यवसाय म्हणून मानले जाते, ज्यासाठी त्यांनी ITR-3 आणि ITR-4 हा फॉर्म भरणं अपेक्षित आहे. (Photo: Pexels)

  • 6/12

    ४) ITR-3 आणि ITR-4
    ITR-3 हा फॉर्म अशा क्रिएटर्ससाठी आहे ज्यांचे उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. त्याच वेळी, जर क्रिएटरने अनुमानित कर भरणा योजनेची निवड केली असेल, तर तो ITR-4 फॉर्म वापरू शकतो. (Photo: Pexels)

  • 7/12

    ही प्रक्रिया अशा क्रिएटर्ससाठी आहे ज्यांचे उत्पन्न ५० लाखांपेक्षा कमी आहे. यामुळे बॅलेंस शीटमधील गुंतागुंतीपासून वाचता येते. (Photo: Pexels)

  • 8/12

    ५) हे खर्च समाविष्ट करता येतील
    युट्यूबर्स त्यांच्या व्यावसायिक खर्चावर आधारित कर कपातीचा दावा करू शकतात. यामध्ये व्हिडिओ प्रॉडक्शन, एडिटिंग, मार्केटिंंग आणि इतर संबंधित खर्च समाविष्ट असू शकतात. (Photo: Pexels)

  • 9/12

    यामुळे त्यांचे करपात्र उत्पन्न कमी होईल. तसेच कमी कर भरावा लागेल. दरम्यान, नोकरदार कर्मचाऱ्यांप्रमाणे, क्रिएटर्स ५० हजार रूपयांच्या मानक कपातीचा लाभ घेऊ शकत नाहीत. (Photo: Pexels)

  • 10/12

    ६) या तथ्यांच्या आधारे विभागणी होते
    आयकर विभाग YouTube क्रिएटर्सच्या उत्पन्नाची त्यांच्या क्रियाकलापांच्या आधारावर विभागणी करतो. जर एखादे चॅनेल नोंदणीकृत व्यवसाय म्हणून चालवले जात असेल तर ते व्यवसायाचे उत्पन्न मानले जाते. (Photo: Pexels)

  • 11/12

    त्याच वेळी, जर चॅनल केवळ मनोरंजन किंवा छंद म्हणून चालवले जात असेल आणि त्यातून उत्पन्न मिळत असेल तर ते ‘इतर स्त्रोतां’च्या उत्पन्नात ठेवले जाते. (Photo: Pexels)

  • 12/12

    (Photo: Pexels)
    हेही वाचा- कॅनडामधील सर्वात धनाढ्य भारतीय; रिअल इस्टेटचा ‘किंग’ अशी ओळख, वाचा मालमत्तेची माहिती…

TOPICS
ट्रेंडिंगTrendingमराठी बातम्याMarathi News

Web Title: How much tax will those who earn from youtube have to pay know the easy calculation spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.