-
भारत आणि कॅनडामध्ये सातत्याने तणाव वाढत आहे. हे संपूर्ण प्रकरण गेल्या वर्षी झालेल्या निज्जर हत्याकांडाशी संबंधित आहे. आतापर्यंत कॅनडाने निज्जर हत्याकांडाशी संबंधित पुरावे भारताकडे सुपूर्द केल्याचा दावा केला होता, मात्र भारत हा दावा फेटाळत होता. (Photo: Justin Trudeau/Insta)
-
निज्जरच्या हत्येशी संबंधित कोणतेही पुरावे कॅनडाने दिलेले नाहीत, असे भारताने म्हटले आहे. आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी स्पष्ट केले आहे की संपूर्ण दोष कॅनडाचा आहे. (Photo: PTI)
-
जस्टिन ट्रुडो यांनी आपली चूक मान्य केली आहे
निज्जर यांच्या हत्येशी संबंधित खरे पुरावे भारताला देण्यात आले नसल्याची कबुली जस्टिन ट्रुडो यांनी दिली आहे. निज्जर हत्याकांडाशी संबंधित केवळ गुप्तचर माहितीच भारताकडे सोपवण्यात आल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे. (Photo: Justin Trudeau/Insta) -
निज्जर यांच्या हत्येचा जाहीरपणे भारतावर आरोप करण्यापूर्वी कॅनडाने केवळ गुप्तचर माहिती दिल्याचे जस्टिन ट्रूडो यांनी मान्य केले आहे. मात्र यासंबंधीचा कोणताही पुरावा देण्यात आलेला नाही. (Photo: PTI)
-
कॅनडाचे नाव कोणी ठेवले?
बरं, आज कॅनडाच्या चुकीमुळे दोन्ही देशांमधला तणाव एवढा वाढला आहे हे स्पष्ट आहे. अशा परिस्थितीत कॅनडाशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेऊया. कॅनडाचे नाव कोणी ठेवले आणि त्याचा अर्थ काय? हे तुम्हाला माहिती आहे का? (Photo: Pexels) -
कॅनडाचा शोध कधी आणि कोणी लावला?
१५३५ मध्ये, (सध्याच्या) क्युबेक सिटी परिसरातील लोकांनी फ्रेंच एक्सप्लोरर जॅक कार्टियर यांना स्टॅडकोना गावाचे वर्णन करण्यासाठी कनाटा हा शब्द वापरला. त्यानंतर जॅक कार्टियरने त्या गावासाठी तसेच डोनाकोना (स्टॅडकोनाचे मुख्य क्षेत्र) या संपूर्ण क्षेत्रासाठी कॅनडा हा शब्द वापरला. (Photo: Pexels) -
छोटंस् गाव एवढा मोठा कॅनडा देश बनला
यानंतर सेंट लॉरेन्स नदीकाठच्या या छोट्याशा भागाला युरोपियन पुस्तकांमध्ये आणि नकाशांमध्ये कॅनडा म्हणून संबोधले जाऊ लागले. एकेकाळी लहान गाव असलेला कॅनडा आज क्षेत्रफळाच्या बाबतीत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. (Photo: Pexels) -
देशाची स्थिती
१६व्या ते १८व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत, लॉरेन्स नदीकाठचे हे भाग अप्पर कॅनडा आणि लोअर कॅनडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रिटिश वसाहती बनले. यानंतर, १८६७ मध्ये लंडनने कॅनडाला कायदेशीर देश घोषित केले. (Photo: Pexels) -
(Photo: PTI) हेही पाहा – कॅनडामध्ये शिख लोकसंख्या किती आहे?, १९८१ मध्ये केवळ ४.७ टक्के अल्पसंख्याक होते…
एकेकाळी कॅनडा होते एक छोटेसे गाव; ‘कॅनडा’चा अर्थ काय, हे नाव कोणी दिले?
Do you know the meaning of Canada? तुम्हाला कॅनडा या नावाचा अर्थ माहित आहे का? हे नाव कोणी आणि केव्हा दिले? एकेकाळी कॅनडा हे फक्त छोटेसे गाव होते.
Web Title: Do you know the meaning of canada who gave this name spl