-
लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातमधील साबरमती जिल्ह्यातील सेंट्रल जेलमध्ये कैद आहे.
-
परंतु तरीही तो त्याचे गुन्हेगारी विश्व कसे चालवतो हा सर्वांसमोरील मोठा प्रश्न आहे.
-
अलीकडेच राजकीय नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
-
त्याने सलमान खानला जीवे मारण्याची दिलेली धमकीही आधीपासून चर्चेत होती.
-
परंतु सलमानचे जवळचे मित्र असलेले बाबा सिद्दिकी यांच्या हत्येने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान कोण आहे हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई? याबद्दल जाणून घेऊया
-
३१ वर्षीय लॉरेन्स बिश्नोईचे नाव २९ मे २०२२ रोजी पंजाबी रॅपर सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर देशासमोर आले. सिद्धू मुसेवाला काँग्रेस पक्षाचे सक्रिय नेते देखील होते. त्यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गॅंगने स्वीकारली होती.
-
लॉरेन्स बिश्नोई हा एक कुख्यात गँगस्टर बनला आहे, त्याची टोळी मुख्यतः पंजाब, राजस्थान आणि हरियाणामध्ये सक्रिय आहे.माध्यमांतील माहितीनुसार त्याचं खरं नाव सतविंदर सिंग असून, तो १९९३ मध्ये पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यात जन्मला आहे.
-
लॉरेन्सच्या कुटुंबाची पार्श्वभूमी जमीनदार कुटुंबाची आहे, ज्यामुळे लहानपणापासूनच आर्थिक स्थिरता असलेल्या कुटुंबात तो वाढला. त्याने चंदीगडमध्ये शिक्षण घेतले आहे. कॉलेजच्या काळात लॉरेन्सने विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकांमध्ये भाग घेतला आणि याच दरम्यान त्याने पहिला खून केला. या घटनेनंतर त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे केले, ज्यामध्ये खंडणी, अंमली पदार्थ तस्करी आणि खून यांचा समावेश आहे. लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातच्या साबरमती जेलमध्ये कैद असला तरी तुरुंगातूनही तो त्याच्या गँगला नियंत्रित करतो, असे म्हटले जाते.
-
माध्यमांतील माहितीनुसार लॉरेन्स बिश्नोईच्या गँगमध्ये सुमारे ७०० सदस्य आहेत. या गँगचे सदस्य भारतातील विविध राज्यांमध्ये सक्रिय आहेत लॉरेन्सने त्याच्या गँगमध्ये विविध शूटर तयार केले आहेत, जे देशभरात विविध गुन्हे करत आहेत. (Photos: Jansatta)
हेही पाहा- लढणारही आणि पाडणारही; मनोज जरांगे पाटलांच्या मराठा समाजाला सूचना, निर्णायक बैठकीत काय ठरलं?
Lawrence Bishnoi : सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणारा गँगस्टर ‘लॉरेन्स बिश्नोई’ कोण आहे?
Who Is Lawrence Bishnoi : ३१ वर्षीय लॉरेन्स बिश्नोईचे नाव २९ मे २०२२ रोजी पंजाबी रॅपर सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर देशासमोर आले.
Web Title: Who is lawrence bishnoi a gangster dares to kill actor salman khan spl