Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. how diwali fireworks can harm your health hidden dangers of firecrackers spl

Diwali : फटाक्यांमधून निघणारा धूर आपल्या आरोग्यासाठी ठरतो हानिकारक; हृदय, डोळे, त्वचेसंबंधीत विकारांचा असतो धोका

Diwali Pollution Effects : दिवाळी हा सण आनंदाचे आणि प्रकाशाचे प्रतीक आहे, परंतु या काळात फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

October 30, 2024 13:24 IST
Follow Us
  • Diwali pollution effects
    1/9

    दिवाळी हा सण आनंदाचे, प्रकाशाचे आणि उत्साहाचे प्रतीक आहे. दिव्यांची रोषणाई, मिठाईचा वास तसेच कुटुंब आणि मित्रमंडळींचा सहवास, या सगळ्यांमुळे दिवाळी खास बनते. मात्र यामध्ये फटाक्यांचा वापर आणि त्यामुळे होणारे प्रदूषण ही गंभीर समस्या बनते. फटाक्यांमध्ये तांबे, कॅडमियम, सल्फर, ॲल्युमिनियम आणि बोरियम यांसारखी हानिकारक रसायने हवेत मिसळतात आणि ते विषारी बनतात. फटाके पेटवताना निघणाऱ्या धुरामुळे आपल्या आरोग्याला अनेक समस्या निर्माण होतात. फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतो ते जाणून घेऊया. (Photo Source: Pexels)

  • 2/9

    फुफ्फुसांना धोका
    फटाक्यांच्या धुरात समाविष्ट असलेले हानिकारक कण आणि वायू थेट आपल्या फुफ्फुसांवर परिणाम करतात. हा धूर जास्त वेळ श्वासातून आपण आत घेतल्यास दमा, ब्राँकायटिस आणि फुफ्फुसात जळजळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. धुरातील कण आपल्या श्वसनसंस्थेवर परिणाम करतात, त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, खोकला आणि छातीत दुखणे अशी लक्षणे दिसून येतात. (Photo Source: Pexels)

  • 3/9

    त्वचा रोग आणि ऍलर्जी
    फटाक्यांमधून निघणाऱ्या धुरातील रसायनांचा त्वचेवरही परिणाम होतो. यामुळे त्वचेला खाज सुटणे, आग होणे आणि लालसरपणा येऊ शकतो. संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांना पुरळ, एक्जिमा आणि त्वचेशी संबंधित इतर समस्यांचा धोका जास्त असतो. दिवाळीदरम्यान हवेतील प्रदूषकं त्वचेला हानी पोहोचवू शकतात आणि ती निर्जीव बनवू शकतात. (Photo Source: Freepik)

  • 4/9

    डोळ्यांच्या समस्या
    फटाक्यांचा धूर आणि त्यामध्ये असलेल्या हानिकारक वायूंमुळे डोळ्यात जळजळ, लालसरपणा आणि खाज सुटू शकते. कधीकधी ही स्थिती इतकी गंभीर होते की डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो. धुराच्या संपर्कात आल्याने डोळ्यांना सूज येऊ शकते. (Photo Source: Freepik)

  • 5/9

    हृदयावर वाईट परिणाम
    धुरात असलेले विषारी घटक हृदयाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. यामुळे रक्तदाब वाढू शकतो, रक्तवाहिन्या अरुंद होऊ शकतात आणि हृदयाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. हृदयविकाराचा त्रास असलेल्या लोकांना फटाक्यांच्या धुरापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (Photo Source: Freepik)

  • 6/9

    मानसिक आरोग्यावर परिणाम
    फटाक्यांच्या आवाजामुळे मानसिक ताण वाढतो. विशेषतः मुले आणि वृद्धांसाठी हे खूप तणावपूर्ण आहे. याव्यतिरिक्त, ध्वनी प्रदूषणामुळे झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो, ज्याचा मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. (Photo Source: Freepik)

  • 7/9

    वातावरणातील प्रदूषण
    फटाक्यांमधून निघणाऱ्या धुरामुळे पर्यावरण दूषित होते. यामुळे हवेतील हानिकारक कणांचे प्रमाण वाढते, ज्याचा झाडे, वनस्पती, प्राणी, पक्षी आणि जलस्रोतांवर नकारात्मक परिणाम होतो. (Photo Source: Pexels)

  • 8/9

    या सर्व समस्या टाळण्यासाठी फटाक्यांऐवजी दिवे, मेणबत्त्या आणि सजावट करून दिवाळी साजरी करणे हा उत्तम पर्याय आहे. हा केवळ पर्यावरण वाचवण्याचा मार्ग नाही तर तो अधिक सुंदर आणि आनंदाही वाढवतो. दरम्यान, जे लोक फटाके फोडण्याचे शौकीन आहेत ते बाजारात उपलब्ध असलेले ग्रीन फटाके वापरू शकतात, ज्यामुळे सामान्य फटाक्यांपेक्षा कमी प्रदूषण होते. (Photo Source: Pexels)

  • 9/9

    हेही पाहा – भारताच्या ‘या’ शहराला ‘सिटी ऑफ ब्लॅक डायमंड’ म्हटले जाते, हे शहर आहे काळ्या हिऱ्यांची भूमी!

TOPICS
दिवाळी २०२४Diwali 2024

Web Title: How diwali fireworks can harm your health hidden dangers of firecrackers spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.