-
अयोध्या नगरीत यंदाची दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रभू श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर ही पहिलीच दिवाळी असल्यामुळे अयोध्येच्या दीपोत्सवाला अनेक भाविकांनी हजेरी लावली.
-
यावेळी अयोध्येत दोन विक्रमांची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये झाली.
-
सर्वाधिक भाविक आरतीला हजर राहणे आणि शरयू नदीच्या ५५ घाटावर २५ लाखांहून अधिक मातीचे दिवे एकत्र लावण्यात आले.
-
दीपोत्सवाच्या आयोजकांनी एकूण २८ लाख दिवे लावण्याचे नियोजन केले होते. मात्र अखेरीस त्यांना २५ लाख १२ हजार ५८५ दिवे लावण्यात यश आले. तसेच महाआरतीमध्ये १,१२१ भाविकांनी सहभाग घेतला.
-
या दीपोत्सवाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांची उपस्थिती होती.
-
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये दोन्ही विक्रमांची नोंद झाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे विश्वविक्रमाच्या नोंदीचे प्रमाणपत्र देण्यात आले.
-
मातीच्या दिव्यांची रोषणाई झाल्यानंतर अयोध्येत भव्य लेझर लाइटचीही रोषणाई करण्यात आली. यामुळे शरयू नदीच्या तीरावर मंत्रमुग्ध करणारे वातावरण निर्माण झाल्याचे उपस्थित असलेले भाविक सांगतात.
-
अयोध्येतील दीपोत्सवाचे फोटो सोशल मीडियावर आता व्हायरल होत असून अनेकांनी या दीपोत्सवाचा त्यातून आनंद घेतला.
-
उत्तर प्रदेश पर्यटन विभागाने शरयूच्या तीरावर १८ विविध चित्ररथ तयार केले होते. या चित्ररथांमधून प्रभू रामाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती देण्यात आली.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही काही दिवसांपूर्वीच अयोध्येतील यंदाची दिवाळी खास असेल असे सांगितले होते. तब्बल ५०० वर्षांनंतर प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान होत आहेत. या घटनेचा साक्षीदार होण्याची संधी मिळाल्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो, असेही ते म्हणाले.
२५ लाख दिव्यांनी उजळली प्रभू श्रीरामाची अयोध्या नगरी, दोन विश्वविक्रमांची नोंद
Ayodhya Deepotsav 2024: अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरची ही पहिलीच दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. २५ लाख दिव्यांच्या रोषणाईने शरयू नदीचा काठ उजळून निघाला. (सर्व फोटो – योगी आदित्यनाथ, नितीन गडकरी एक्स अकाऊंट)
Web Title: Ayodhya deepotsav 2024 sets two new guinness world records in spectacular diwali celebration on lord ram land kvg