• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. how cyber criminals steal your phone number spl

सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये झपाट्याने होतेय वाढ; हे गुन्हेगार आपले मोबाईल क्रमांक कसे चोरतात?, फसवणूक टाळण्यासाठी ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष

how cyber criminals steal phone number: आजच्या काळात सायबर गुन्हे सातत्याने वाढत आहेत, त्यामुळे काही गोष्टींबाबत सतर्क राहण्याची गरज आहे. सायबर घोटाळेबाज तुमचा फोन नंबर कसा चोरतात तसेच संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी कोणत्या गोष्टींबद्दल सतर्क असले पाहिजे? ते जाणून घेऊ.

Updated: November 1, 2024 00:21 IST
Follow Us
  • How To Cyber Criminals Steal Phone Numbers
    1/7

    सध्याच्या काळात सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. फोन हॅक करण्यापासून ते बँक खात्यातून पैसे काढण्यापर्यंत लाखो प्रकरणे समोर येत आहेत. यासोबतच सायबर गुन्हेगार तुमची ओळख चोरून आपली फसवणूक करतात. सायबर गुन्हेगार तुमचा फोन नंबर कसा चोरतात?, फसवणूक टाळण्यासाठी कोणत्या गोष्टींबद्दल सतर्क असले पाहिजे? ते जाणून घेऊ. (फोटो: पेक्सेल्स)

  • 2/7

    लिंकवर क्लिक करू नका
    सायबर गुन्हेगार बऱ्याचदा खरे वाटणारे बनावट संदेश आणि ईमेल लोकांना पाठवतात. या मेसेजमध्ये काही लिंक्स असतात आणि तुम्ही त्या लिंकवर क्लिक करताच तुमचा फोन नंबर आणि इतर अनेक माहिती सायबर गुन्हेगार चोरतात. त्यामुळे अशावेळी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. (फोटो: पेक्सेल्स)

  • 3/7

    बनावट ऑफर
    याशिवाय अनेक वेळा सायबर गुन्हेगार तुम्हाला खोट्या ऑफरचे आमिष दाखवतात ज्यामध्ये ते तुमचा फोन नंबर आणि पत्ता विचारतात. माहिती शेअर करताच सायबर गुन्हेगार त्यांचे काम साधून घेतात. (फोटो: पेक्सेल्स)

  • 4/7

    सोशल मीडिया धोकादायक आहे
    आजकाल अनेकांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक होताना दिसत आहेत. सायबर गुन्हेगार सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तुमचा नंबर चोरू शकतात. वास्तविक, अनेक वेळा आपण आपला नंबर सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये टाकतो जो सायबर गुन्हेगारांना सहज दिसू शकतो आणि इथे तुमची फसवणूक होऊ शकते. अशा वेळी गोपनियता सेटींग्स तपासा. (फोटो: पेक्सेल्स)

  • 5/7

    बनावट कॉल
    अनेक वेळा सायबर गुन्हेगार कंपनीच्या नावाने बनावट कॉल करतात. सर्वेक्षणाचे कारण सांगून ते तुमच्याकडून फोन नंबर, पत्ता व इतर माहिती घेऊ शकतात, अशावेळी तुम्ही जास्त सतर्क राहा. (फोटो: पेक्सेल्स)

  • 6/7

    वाय-फाय
    सायबर गुन्हेगार सार्वजनिक वाय-फायद्वारे तुमचा फोन ट्रॅक करू शकतात. नंबरसोबतच इतर गुप्तचर माहितीही चोरली जाऊ शकते. त्यामुळे अनोळखी व्यक्तींना वायफाय कधीच देऊ नका. (फोटो: पेक्सेल्स)

  • 7/7

    ॲप फसवणूक
    असे अनेक ॲप्स आहेत जे डाऊनलोड केल्यानंतर आणि परवानगी दिल्यानंतर केवळ तुमचा नंबरच नाही तर सर्व संपर्क क्रमांक आणि इतर माहितीही चोरुन घेऊ शकतात. त्यामुळे फोनमध्ये संशयास्पद ॲप्स असल्यास ते त्वरित डिलीट करा. (फोटो: पेक्सेल्स)

TOPICS
ट्रेंडिंगTrending

Web Title: How cyber criminals steal your phone number spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.