-
हिंदू धर्मात छठ पूजेला विशेष महत्त्व आहे. तीन दिवसीय छठ उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या काळात पूजेमध्ये अनेक गोष्टींचा वापर केला जातो ज्यांचे विशेष महत्त्व आहे. (Photo Source: Indian Express)
-
छठच्या वेळी पूजा करण्यासाठी सूप वापरतात. पण छठ पूजेमध्ये या सूपाला इतके महत्त्व का आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? (Photo Source: Indian Express)
-
मान्यतेनुसार छठ पूजेमध्ये बांबूच्या सूपाचा वापर करणे आवश्यक आहे. सूपशिवाय छठपूजा अपूर्ण मानली जाते. ही परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे. (Photo Source: Indian Express)
-
सूर्यदेवाच्या पूजेसाठी अर्घ्य देताना बांबूपासून बनवलेले सूप वापरले जाते. यासोबतच छठात प्रसाद ठेवण्यासाठीही याचा वापर केला जातो. (Photo Source: Indian Express)
-
छठ पूजेत वापरले जाणारे सूप पितळ, स्टील किंवा इतर कोणत्याही धातूचे नसावे. त्यामुळे बांबूपासून बनवलेले सूप वापरले जाते. (Photo Source: PTI)
-
सूप निसर्गाशी जोडलेले आहे. वास्तविक, बांबू ही एक नैसर्गिक वस्तू आहे आणि ती निसर्गाचे प्रतीक मानली जाते. यामुळेच छठ पूजेमध्ये बांबूचे सूप वापरले जाते. (Photo Source: PTI)
-
बांबूला सर्वात शुद्ध आणि पवित्र मानले जाते त्यामुळे छठ पूजेमध्ये बांबूपासून बनवलेले सूप वापरले जातो. .याशिवाय सूपाबाबत आणखी एक मत मांडले जाते. (Photo Source: PTI)
-
बांबूच्या सूपाचा वापर हा सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी केला जातो अशीही एक धारणा आहे. यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात आणि व्रत करणाऱ्याला इच्छित फळ मिळते. (Photo Source: ANI)
-
दरम्यान देशात मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा केला जात आहे. (Photo Source: PTI)
-
हा फोटो बिहारमधील पटना जिल्ह्यातील आहे. गंगा नदीत विधिवत पूजा करत प्रार्थना करताना भाविक. (Photo Source: PTI)
-
४ दिवसीय छठपूजा महोत्सवासाठी बाजारपेठा गर्दीने भरल्या आहेत. (Photo Source: PTI)
-
पटना येथील गंगा नदीतील आणखी एक फोटो. (Photo Source: PTI)
-
(Photo Source: PTI) हेही पाहा- Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प पहिल्याच नजरेत ‘या’ मुलीवर झाले होते फिदा, ‘अशी’ आहे अमे…
छठ पूजेवेळी बांबूपासून तयार केलेले सूप का वापरले जाते? देशभरात महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
Why is bamboo soop used in Chhath Puja: छठच्या वेळी पूजा करण्यासाठी बांबूपासून बनवलेले सूप वापरतात. पण छठ पूजेमध्ये या सूपाला इतके महत्त्व का आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?
Web Title: Why is bamboo soop used in chhath puja what is its importance sacred moments from festival across india spl