Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. asia richest village is in gujarat india with rs 7000 crore in banks spl

आशियातील सर्वात श्रीमंत गाव चक्क आपल्या भारतात, एवढच नाही गावकऱ्यांकडून बँकांमध्ये ७ हजार कोटी रुपये जमा

Richest Village in India: हे गाव कोणतं आहे?, या गावामध्ये चक्क १७ राष्ट्रीय बँकांच्या शाखाही आहेत.

November 13, 2024 15:17 IST
Follow Us
  • Asia's richest village
    1/9

    साधारणपणे, गावे गरिबी आणि कमी संसाधनांशी संबंधित असतात, परंतु भारताच्या गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यात स्थित ‘माधापर गाव’ ही धारणा चुकीची सिद्ध करते. हे गाव आशियातील सर्वात श्रीमंत गावांपैकी एक आहे.

  • 2/9

    या गावाच्या समृद्धीचा अंदाज यावरूनच लावला जाऊ शकतो की येथील रहिवाशांनी स्थानिक बँकांमध्ये अंदाजे ७ हजार कोटी रुपये जमा केले आहेत. माधापर गावाच्या आर्थिक भरभराटीचे प्रमुख कारण म्हणजे गावाशी निगडीत अनिवासी भारतीय (Non-Resident Indian).

  • 3/9

    ही कुटुंबे विशेषत: आफ्रिकन देशांमध्ये राहणारे गुजराती समुदाय दरवर्षी गावामधील बँकांमध्ये आणि पोस्ट ऑफिसमध्ये कोट्यवधी रुपये जमा करतात. याशिवाय गावातील अनेक मुळ रहिवासी नागरिक यूके, ऑस्ट्रेलिया, यूएसए आणि न्यूझीलंड सारख्या देशांमध्येही राहतात.

  • 4/9

    हे लोक कायमस्वरूपी परदेशात स्थायिक झाले असले तरी ते आपल्या मुळाशी जोडलेले आहेत आणि आपल्या कमाईचा मोठा हिस्सा गावामध्ये गुंतवतात. माधापारच्या समृद्धीमुळे येथे अनेक बँकांच्या शाखा सुरू आहेत.

  • 5/9

    गावात एचडीएफसी बँक, एसबीआय, पीएनबी, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक आणि युनियन बँक यासारख्या प्रमुख सार्वजनिक आणि खाजगी बँकांसह एकूण १७ बँकांच्या शाखा आहेत. एखाद्या गावात बँकांच्या इतक्या शाखा असणे अत्यंत असामान्य आहे, परंतु इतर बँकांनाही येथे शाखा उघडण्यात रस आहे.

  • 6/9

    माधापर गावात पाणी, स्वच्छता, रस्ते, बंगले, शाळा, तलाव, मंदिरे अशा सर्व मूलभूत सुविधा आहेत. या गावात सुमारे २०,००० घरे आहेत, त्यापैकी सुमारे १२०० कुटुंबे परदेशात राहतात. परदेशातून सातत्याने येणाऱ्या निधीमुळे गावाच्या अर्थव्यवस्थेत मोठी सुधारणा झाली आहे.

  • 7/9

    गुजरात हे व्यापार आणि उद्योगात आघाडीचे राज्य आहे, परंतु त्याची समृद्धी केवळ शहरी भागापुरती मर्यादित नाही. त्याचेच उदाहरण म्हणजे ‘माधापर गाव’. हे गाव केवळ आर्थिकच नाही तर पायाभूत सुविधांच्या बाबतीतही खूप विकसित आहे. माधापरचे लोक परदेशात राहात असले तरी ते त्यांच्या गावाशी जोडलेले राहतात आणि त्यांना आर्थिक पाठबळ देत राहतात.
    हेही पाहा- पाकिस्तानी सैन्याला ताकदीसाठी दिल्या जातात ‘या’ गोष्टी, जाणून घ्या लष्कराचा आहार कसा आहे?

  • 8/9

    (All Photos Source: @creatorsofkutch/instagram)

  • 9/9

    हेही वाचा- ‘Kapil Sharma Show’ मध्ये फक्त खुर्चीवर बसून हसायचे अर्चना पूरन सिंहला मिळतात तब्बल इतके पैसे, जगते आलिशान जीवन

TOPICS
गुजरातGujaratट्रेंडिंगTrending

Web Title: Asia richest village is in gujarat india with rs 7000 crore in banks spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.