• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. this regiment of indian army was created by the british today it is the pride of india spl

भारतीय लष्करातील ‘या’ रेजिमेंटचे नाव ऐकून शत्रू थरथर कापतात, ब्रिटिशकालीन रेजिमेंट आहे सैन्याचा अत्यंत महत्वाचा भाग…

Indian Artillery Regiment: भारतीय सैन्यात अनेक रेजिमेंट आहेत, पण एक रेजिमेंट अशी आहे जिच्या नावाने शत्रूंचा थरकाप उडतो. ही रेजिमेंट इंग्रजांनी स्थापन केली होती.

January 26, 2025 16:08 IST
Follow Us
  •  History of Indian Artillery Regiment
    1/11

    २६ जानेवारी हा दिवस भारतीयांसाठी खूप खास आहे. आपली राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी तयार झाली. अशा परिस्थितीत आपण दरवर्षी २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. यावर्षी भारत आपला ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. प्रजासत्ताक दिन, देशाच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक असलेला राष्ट्रीय सण आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून कोहिमापर्यंत देशभरात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जात आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 2/11

    यावेळी लष्कराच्या तिन्ही तुकड्यांनी परेड केली. या समारंभात इतिहासात पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनानिमित्त लष्कर, नौदल आणि वायुसेनेची स्वतंत्र झलक आणली गेली नाही. या वर्षी तिन्ही सेनादलांची परेड संयुक्तपणे सादर करण्यात आली. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 3/11

    दरम्यान, भारतीय सैन्यात अनेक रेजिमेंट आहेत, त्यापैकी एक रेजिमेंट आहे जी ब्रिटिशांनी तयार केली होती. या रेजिमेंटच्या शौर्याच्या अनेक कहाण्या आहेत. आज या रेजिमेंटचे नाव ऐकून शत्रू थरथर कापतात. चला त्याबद्दल जाणून घेऊया: (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 4/11

    वास्तविक, ही दुसरी कोणी नसून आर्टिलरी (तोफखाना) रेजिमेंट आहे जी भारतीय सैन्याचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग मानली जाते. आज या तोफखाना रेजिमेंटकडे जगातील सर्वात आधुनिक शस्त्रे आहेत. आर्टिलरी रेजिमेंट सर्व ग्राउंड ऑपरेशन्स दरम्यान भारतीय सैन्याला जोरदार फायर पॉवर प्रदान करते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 5/11

    तोफखाना रेजिमेंटचे काम शत्रूच्या सैन्याचा नाश करणे आणि त्याच वेळी त्याच्या उर्वरित पायदळ युनिट्ससाठी मार्ग तयार करणे आहे. आर्टिलरीला ‘गॉड ऑफ वॉर’ म्हणूनही ओळखले जाते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 6/11

    या रेजिमेंटची सुरुवात ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये रॉयल इंडियन आर्टिलरी म्हणून झाली, जीला स्वातंत्र्यानंतर भारतीय सैन्याची आर्टिलरी रेजिमेंट असे नाव देण्यात आले. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 7/11

    तोफखाना रेजिमेंटच्या प्रत्येक सैनिकाला गनर्स म्हणतात. २८ सप्टेंबर १८२७ रोजी भारतीय तोफखाना रेजिमेंटची पहिली युनिट (५ बॉम्बे माउंटन बॅटरी) तयार झाली. त्यानंतर बॉम्बे फूट आर्टिलरीच्या गुनाली बटालियनची ८ वी कंपनी म्हणून ती उभारण्यात आली. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 8/11

    भारतीय लष्कराची दुसरी सर्वात मोठी शाखा म्हणजे आर्टिलरी रेजिमेंट. ग्राउंड ऑपरेशन्स दरम्यान सैन्याला फायर पॉवर पुरवणे हे त्यांचे काम आहे. आर्टिलरी रेजिमेंट देखील दोन भागात विभागली गेली आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 9/11

    पहिल्या भागात क्षेपणास्त्रे, रॉकेट, मोर्टार, बंदुका, तोफा इत्यादी प्राणघातक शस्त्रे समाविष्ट आहेत. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 10/11

    तर दुसऱ्या भागात रडार, पाळत ठेवणारी यंत्रणा आणि ड्रोनसारखी शस्त्रे आहेत. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 11/11

    दसऱ्याच्या दिवशी तोफखान्यातील प्रत्येक सैनिक आपल्या बंदुकांची अत्यंत आदराने पूजा करतो. तसेच, रक्षाबंधनाच्या सणाच्या दिवशी तुकड्या बंदुकीला राखीही बांधतात. (फोटो: इंडियन एक्सप्रेस) हेही पाहा- भारतातील सर्वात श्रीमंत इन्फ्लुएंसर; नोकरीतून मिळायचे फक्त ५ हजार रुपये, आज गडगंज संपत्तीचा धनी!

TOPICS
ट्रेंडिंगTrendingप्रजासत्ताक दिन २०२५Republic Day 2025मराठी बातम्याMarathi Newsलष्करArmy

Web Title: This regiment of indian army was created by the british today it is the pride of india spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.