-
मंडळी यंदाचा मान्सून आता दाखल झाला आहे, जोरदार पाऊस पडतो आहे, अशावेळी आपण रोज ऑफिसला जाण्यासाठी बाहेर पडल्याशिवाय पर्याय नसतो, त्यामुळे बाहेर पावसातून वाट काढत आपण निश्चित ठिकाणावर पोहोचत असतो. दरम्यान, अशावेळी आपल्याजवळील स्मार्टफोन पाण्यापासून सुरक्षित राहावा यासाठी काय करता येईल? याबद्दल जाणून घेऊ (Photo: Freepik)
-
वॉटरप्रूफ केस
पाण्याचे थेंब, पावसाचे शिंतोडे यापासून मोबाईलचे संरक्षण करण्यासाठी हा कव्हर केस व्यवस्थित काम करतो फक्त तुम्ही तुमच्या मोबाईलचे सर्व पोर्ट आणि बटणे कव्हर झालेत का याची खात्री करा आणि मगच केस खरेदी करा. (Photo: Freepik) -
वॉटरप्रूफ पाउच
जर तुम्हाला कायमस्वरूपी वॉटरप्रूफ केस नको असेल, तर वॉटरप्रूफ पाउच वापरण्याचा विचार करा. हे पाउच स्वस्त आहेत आणि तुम्ही तुमचा फोन सुरक्षितपणे आत राहू शकतो, ज्यामुळे पाण्यापासून त्याचे रक्षण होते. (Photo: Freepik) -
पावसात जाणे टाळा
जेव्हा शक्य असेल तेव्हा, तुमचा स्मार्टफोन थेट मुसळधार पावसात बघणे टाळा. जर तुम्हाला मुसळधार पावसात तुमचा फोन बाहेर काढण्याशिवाय पर्यायच नसेल तर त्याचा पाण्यापासून बचाव करण्यासाठी छत्री वापरा. लक्षात ठेवा उपचारापेक्षा प्रतिबंध केव्हाही चांगला असतो. (Photo: Freepik) -
तुमचा फोन कोरड्या जागी ठेवा
पावसाळ्यात बाहेरून घरी परतल्यानंतर, तुमचा फोन कोरड्या जागी ठेवा. त्याला ओला खिसा, पिशवी किंवा ओल्या जागी ठेवू नका. सुरक्षित ठिकाणी ठेवण्यापूर्वी तो मऊ कापडाने पुसून कोरडा करता येईल. (Photo: Freepik) -
स्क्रीन प्रोटेक्टर वापरा
पावसाच्या पाण्यात घाणही असू शकते जी तुमच्या फोनच्या स्क्रीनला स्क्रॅच करू शकते किंवा नुकसान करू शकते. पाणी, धूळ आणि इतर कणांपासून संरक्षण करण्यासाठी उच्च दर्जाचा स्क्रीन प्रोटेक्टर बसवून घ्या. (Photo: Freepik) -
पाण्याजवळ सावधगिरी बाळगा
घसरुन पडणे वगेरे सारख्या अपघातात तुमच्या फोनचेही मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे तुमचा फोन सुरक्षित राहणे गरजेचे आहे त्यामुळे अतिरिक्त संरक्षणासाठी वॉटरप्रूफ पाउच किंवा केस वापराच, कारण कधी काय होईल? सांगता येत नाही. (Photo: Freepik) -
वादळाच्या वेळी काय कराल?
वादळ किंवा मुसळधार पावसादरम्यान, तुमचा फोन बंद करणे आणि तो चार्जिंग केबल्सपासून डिस्कनेक्ट करणे योग्य ठरते. विजांच्या गडगडटामुळे तुमच्या डिव्हाइसचे नुकसान होऊ शकते. (Photo: Freepik) -
ब्लूटूथ स्पीकर किंवा हेडफोन वापरा
तुमचा स्मार्टफोन थेट पाण्याच्या संपर्कात येऊ नये म्हणून, पावसाळ्यात गाणी ऐकताना किंवा कॉल करताना ब्लूटूथ स्पीकर किंवा हेडफोन वापरण्याचा विचार नक्की करा. (Photo: Freepik) -
नियमितपणे स्वच्छ आणि कोरडा करा
पावसाळ्यात आर्द्रतेमुळे तुमच्या फोनमध्ये ओलावा जमा होऊ शकतो. तुमचे डिव्हाइस नियमितपणे मऊ कापडाने स्वच्छ करा आणि त्याला सुका ठेवा. चार्जिंग पोर्ट, ऑडिओ जॅक आणि स्पीकर ग्रिलकडे विशेष लक्ष द्या. (Photo: Freepik) -
तुमचा डेटा बॅकअप घ्या
दुर्दैवाने पाण्यामुळे नुकसान झाल्यास, तुमच्या फोनच्या डेटाचा अलिकडचा बॅकअप घेणे हे तुमच्यासाठी सोईचे ठरेल, म्हणून तुमच्या महत्त्वाच्या फाइल्स, फोटो आणि संपर्काचा डेटा नियमितपणे सुरक्षित क्लाउड स्टोरेजवर किंवा बाह्य हार्ड ड्राइव्हवर बॅकअप करून घ्या. (Photo: Freepik)
पावसाळ्यात तुमचा स्मार्टफोन सुरक्षित ठेवा, ‘या १० टिप्स नक्की फॉलो करा…
आपल्याजवळील स्मार्टफोन पावसाच्या पाण्यापासून सुरक्षित राहावा यासाठी काय करता येईल? याबद्दल जाणून घेऊ
Web Title: 10 ways to keep your smartphone protected during monsoon season spl