• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. iran and israel war photos destruction scene explosions everywhere as far as eyes can see spl

इस्रायल-इराण संघर्षाची भीषणता दर्शवणारे फोटो; दोन्ही देशांत नजर जाईल तिथपर्यंत फक्त उद्ध्वस्त स्थिती, पाहा Photos

Israel-Iran Destruction Scene: इस्रायल व इराण यांच्यात चालू असलेला संघर्ष आता विकोपाला गेला आहे. यावेळी दोन्ही देश एकमेकांवर सतत हल्ले करत आहेत. इराणमध्ये आत्तापर्यंत ६०० नागरिकांचा मृत्यू झाला आहो तर १३०० हून अधिक जखमी आहेत.

June 18, 2025 17:58 IST
Follow Us
  • Iran and Israel war pictures
    1/12

    सध्या जगातील अनेक देशांमध्ये संघर्ष सुरू आहे, त्यापैकी एक म्हणजे इस्रायल आणि इराण. यावेळी दोन्ही देश सतत एकमेकांवर हल्ले करत आहेत. (छायाचित्र: रॉयटर्स)

  • 2/12

    पण इराणचे सर्वाधिक नुकसान होत आहे. इस्रायली सैन्याने ५० लढाऊ विमानांच्या हवाई हल्ल्याने इराणला मोठा धक्का दिला आहे. (छायाचित्र: एपी)

  • 3/12

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्रायली हवाई दलाने रात्रीच्या वेळी हल्ला करून २० इराणी लक्ष्ये उद्ध्वस्त केली आहेत. यामध्ये अणु केंद्राचे सेंट्रीफ्यूज उत्पादन स्थळ आणि तेहरानमधील क्षेपणास्त्र उत्पादन केंद्राचा समावेश आहे. (छायाचित्र: एपी)

  • 4/12

    या हल्ल्याचे काही फोटो समोर आले आहेत ज्यात विनाशाचे दृश्य स्पष्टपणे दिसत आहे. (छायाचित्र: एपी)

  • 5/12

    दोन्ही देशांमध्ये जिथे जिथे क्षेपणास्त्रे पडली तिथे तिथे प्रचंड विनाश झाला. (छायाचित्र: एपी)

  • 6/12

    घरे जीर्ण झाली आहेत. मोठे अपार्टमेंट उद्ध्वस्त झालेले दिसत आहेत. (छायाचित्र: रॉयटर्स)

  • 7/12

    इराणनेही शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी इस्रायलवर हल्ला केला. इस्रायलच्या तेल अवीव, हैफा आणि रेहोवोट शहरांचे बरेच नुकसान झाले आहे. (छायाचित्र: एपी)

  • 8/12

    त्याच वेळी, इस्रायलने इराणच्या मुख्य अणुसंवर्धन केंद्रावर, नतान्झवर मोठा हल्ला केला, जो इराणच्या अणुकार्यक्रमाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. (छायाचित्र: एपी)

  • 9/12

    इराणचे मोठे नुकसान झाले आहे. इस्रायली हल्ल्यात अनेक वरिष्ठ इराणी लष्करी अधिकारी आणि नऊहून अधिक अणुशास्त्रज्ञांना आपला जीव गमवावा लागला आहे. (छायाचित्र: एपी)

  • 10/12

    या हल्ल्यात इस्रायलने इराणचे मशहाद विमानतळ आणि इंधन भरणारे विमान देखील उद्ध्वस्त केले आहे. यासोबतच कुद्स फोर्सच्या तळांवरही हल्ला करण्यात आला ज्यामध्ये इराणचे मोठे नुकसान झाले आहे. कुद्स फोर्सचे तळ राजधानी तेहरानमध्ये आहे. (छायाचित्र: एपी)

  • 11/12

    समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये विनाशाचे भयानक दृश्य दिसून येत आहे. (छायाचित्र: रॉयटर्स)

  • 12/12

    या हल्ल्यात इस्रायलला कमी नुकसान झाले कारण अ‍ॅरो, डेव्हिस स्लिंग आणि आयर्न डोम सारख्या इस्रायली हवाई संरक्षण प्रणालींनी १०० हून अधिक इराणी क्षेपणास्त्रे आणि ३०० हून अधिक ड्रोन रोखून नष्ट केले. (छायाचित्र: एपी) हेही पाहा- Israel Iran Conflict : हवाई हल्ल्यांपासून संरक्षण करणारं इस्त्रायलचं ‘आयर्न डोम’ नेमकं कसं काम करतं?

TOPICS
आंतरराष्ट्रीय बातम्याInternational NewsइराणIronइस्रायलIsraelट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग टॉपिकTrending Topicट्रेंडिंग फोटोTrending Photoमराठी बातम्याMarathi Newsयुद्ध (War)War

Web Title: Iran and israel war photos destruction scene explosions everywhere as far as eyes can see spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.