-
असा देश जिथे आजही २०१७ साल सुरू आहे!
तुम्ही कधी कल्पना केली आहे का की जगात एक असा देश आहे, जिथे वेळ सात वर्षांनी मागे आहे? हो, हे खरं आहे! आफ्रिकेतील इथिओपिया नावाच्या देशात आजही २०१७ साल सुरू आहे. जग २०२५ मध्ये आहे, पण इथल्या लोकांसाठी अजूनही २०१७ संपलेलं नाही. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
सात वर्षांनी मागे असण्यामागचं गूढ कारण
इथिओपिया सात वर्षांनी मागे का आहे, याचं उत्तर आहे गीझ कॅलेंडर! जगभरात वापरलं जाणारं ग्रेगोरियन कॅलेंडर न वापरता इथिओपिया आपलं पारंपरिक गीझ कॅलेंडर वापरतो, जे वेळेच्या हिशोबात वेगळं आहे. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
१३ महिन्यांचं खास कॅलेंडर
गीझ कॅलेंडरचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यात १३ महिने असतात! पहिले १२ महिने प्रत्येकी ३० दिवसांचे असतात आणि शेवटचा महिना ‘पॅग्युम’ फक्त ५ किंवा ६ दिवसांचा असतो, म्हणूनच इथिओपियाचं कॅलेंडर जगभरात वेगळं आणि खास मानलं जातं. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
इथिओपियन कॅलेंडर सात वर्षे मागे का आहे?
जग बहुतेक ठिकाणी येशू ख्रिस्तांचा जन्म इ.स.पूर्व १ मध्ये झाला असे मानतात, पण इथिओपियन चर्चनुसार तो इ.स.पूर्व ७ मध्ये झाला. हाच फरक त्यांच्या कॅलेंडरमध्येही आहे, त्यामुळे इथिओपिया जगाच्या वेळेपेक्षा सात ते आठ वर्षांनी मागे आहे. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
वेगळ्या तारखांना साजरे होणारे सण
इथिओपियामध्ये नवीन वर्ष ११ किंवा १२ सप्टेंबरला साजरे होते. पावसाळा संपल्यावर सुरू होणारे हे वर्ष आनंदाचा आणि नव्या सुरुवातीचा संकेत मानले जाते. तसेच, ख्रिसमसही २५ डिसेंबरला नव्हे तर ७ जानेवारीला साजरा होतो. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
एक सांस्कृतिक ओळख
गीझ कॅलेंडर ही फक्त वेळ मोजण्याची पद्धत नाही, तर इथिओपियाच्या संस्कृतीचं प्रतीक आहे. हा एकमेव आफ्रिकन देश आहे, जो कधीच युरोपिय वसाहतीच्या ताब्यात गेला नाही, म्हणूनच त्यांच्या परंपरा आजही शाबूत आहेत. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
दोन कॅलेंडर एकत्र वापरण्याची रीत
इथिओपियन लोक दोन्ही कॅलेंडर वापरतात. रोजच्या सरकारी आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी ग्रेगोरियन कॅलेंडर, तर धार्मिक सण आणि परंपरांसाठी गीझ कॅलेंडरचा वापर केला जातो. हेच त्यांच्या जीवनशैलीचं वैशिष्ट्य आहे. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
वेगळ्या काळात फिरण्याचा अनुभव!
इथिओपियाला भेट देणं म्हणजे वेगळ्याच काळात फिरायला जाणं! इथं केवळ सुंदर निसर्ग आणि प्राचीन चर्चचं सौंदर्य नाही, तर जगापेक्षा वेगळ्या वेळेत जगण्याचा अनोखा अनुभव मिळतो. स्थानिक लोक दोन्ही कॅलेंडर वापरत असल्यामुळे पर्यटकांना काही अडचण भासत नाही. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
निसर्गप्रेमींसाठी आदर्श ठिकाण
इथिओपिया केवळ धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध नाही, तर तो निसर्गप्रेमींनाही खुणावतो. दाट जंगले, दुर्मीळ प्राणी आणि ऐतिहासिक स्थळं ही या देशाची खास ओळख आहेत. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
मानवजातीची सुरुवात याच ठिकाणाहून?
अफार या भागात सापडलेला ३.२ दशलक्ष वर्षांपूर्वीचा “लुसी” नावाचा सांगाडा हे सिद्ध करतो की मानवी इतिहासाची सुरुवात याच भूमीत झाली असावी, त्यामुळे इथिओपियाला “मानवतेचे जन्मस्थान” म्हटलं जातं. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
श्रद्धा आणि स्वादाचा अनोखा संगम
इथिओपियामध्ये ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन धर्म मानला जातो आणि उपवासाचे काटेकोर पालन केले जाते. या काळात प्राणीजन्य पदार्थ टाळले जातात, त्यामुळे इथं अस्सल, चविष्ट शाकाहारी जेवण सहज मिळतं, जे पर्यटकांचंही मन जिंकतं. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)
‘इथे’ २०२५ नाही तर २०१७ सुरू? जगापेक्षा सात वर्ष मागे चालतोय ‘हा’ देश…
अनोखी कॅलेंडर प्रणाली: संपूर्ण जगात २०२५ वर्षाचा अर्धा भाग उलटून गेला आहे, पण तुम्हाला माहिती आहे का की आफ्रिकेत एक देश आहे जो २०१७ मध्येही जिवंत आहे. ही कल्पनारम्य नाही तर वास्तव आहे. चला या देशाबद्दल जाणून घेऊया.
Web Title: Why ethiopia is 7 years behind the world calendar interesting facts about ethiopian calendar svk 05