• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. nikhil kamath lists jobs that will survive the next 10 years questions college education aam

“पुढील १० वर्षांत फक्त ‘याच’ नोकऱ्या टिकतील”; निखिल कामथ म्हणाले, “शिक्षण…”

Nikhil Kamath Lists Jobs That Will Exist In 10 years: एआयचा वापर जसजसा वाढत चालला आहे तसतसे पारंपारिक नोकऱ्या कमी होण्याची भीती निर्माण होत आहे.

June 26, 2025 18:25 IST
Follow Us
  • Nikhil Kamath Lists jobs that will exist in 10 years
    1/9

    झेरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांनी अलीकडेच त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर ‘डब्ल्यूईएफच्या फ्युचर ऑफ जॉब्स रिपोर्ट २०२५’ बाबत पोस्ट केली आहे.

  • 2/9

    या पोस्टमध्ये ते म्हणाले की, “खूप मनोरंजक प्रश्न: ‘१० वर्षांत कोणत्या नोकऱ्या प्रासंगिक असतील?’ वैयक्तिकरित्या, मला वाटते की ४ वर्षांच्या महाविद्यालयीन अभ्यासक्रमांचे दिवस संपले आहेत. आयुष्यभर शिक्षण घेणे हा प्रत्येकासाठी नवीन आदर्श असेल.”

  • 3/9

    निखिल कामथ यांनी शेअर केलेल्या पोस्टमधील अहवालात म्हटले आहे की, शेत मजूर, डिलिव्हरी ड्रायव्हर्स, बांधकाम मजूर आणि अन्न प्रक्रिया कामगार यांच्या नोकऱ्यांमध्ये मोठी वाढ होईल.

  • 4/9

    पुढील पाच वर्षांत नर्सिंग, सामाजिक कार्य आणि समुपदेशनाचे काम करणाऱ्यांच्या नोकऱ्यांमध्ये लक्षणीय वाढीची अपेक्षा आहे.

  • 5/9

    तंत्रज्ञानाशी संबंधित नोकऱ्या टक्केवारीच्या बाबतीत सर्वात वेगाने वाढणाऱ्या नोकऱ्या असतील, ज्यामध्ये डेटा सायंटिस्ट, फिनटेक अभियंते, एआय आणि मशीन लर्निंग अ‍ॅनालिस्ट, तसेच सॉफ्टवेअर व अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपर्स यांचा समावेश असेल.

  • 6/9

    “कॅशियर, तिकीट क्लर्क, प्रशासकीय सहाय्यक, कार्यकारी सचिवांसह लिपिक आणि सचिवीय कर्मचाऱ्यांच्या संख्येत सर्वात मोठी घट अपेक्षित आहे.

  • 7/9

    “विश्लेषणात्मक विचारसरणी” ही नोकरी देणाऱ्या कंपन्यांची सर्वाधिक मागणी असलेले मुख्य कौशल्य आहे. २०२५ मध्ये १० पैकी सात कंपन्यांनी ते आवश्यक मानले आहे. त्यानंतर लवचिकता, चपळता, नेतृत्व आणि सामाजिक नेतृत्त्व यांचा समावेश आहे.

  • 8/9

    दरम्यान, पोस्टल सर्व्हिस क्लर्क, बँक टेलर आणि डेटा एंट्री क्लर्क यांच्या नोकऱ्यांमध्ये सर्वात वेगाने घट होण्याची अपेक्षा आहे,” असे अहवालात म्हटले आहे.

  • 9/9

    “सर्वात वेगाने वाढणाऱ्या कौशल्यांच्या यादीत एआय आणि डेटा अव्वल स्थानावर आहेत. त्यानंतर नेटवर्क आणि सायबर सुरक्षा तसेच तंत्रज्ञान साक्षरता आहे,” असे फ्युचर ऑफ जॉब्स रिपोर्टमध्ये म्हटले आहे. (सर्व फोटो सौजन्य: Nikhil Kamath/Facebook)

TOPICS
माहिती तंत्रज्ञानInformation Technologyशिक्षणEducationसरकारी नोकरीGovt Jobs

Web Title: Nikhil kamath lists jobs that will survive the next 10 years questions college education aam

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.