• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. jai jagannath rath yatra 2025 celebrations puri prayagraj ahmedabad bangal svk

‘जय जगन्नाथ’चा गजर देशभर; पुरीपासून ते प्रयागराज, अहमदाबादपर्यंत भक्तिमय रथयात्रा

पुरीतील भव्य रथ सजावट, अहमदाबादमधील ‘पहिंद’ विधी, प्रयागराजची भक्तिभावनेने भरलेली मिरवणूक आणि बंगालच्या उत्सवमय वातावरणात भारतभर रथयात्रेचा जयघोष; सुरक्षेसाठी एआयच्या मदतीसह कडेकोट बंदोबस्त.

June 27, 2025 17:01 IST
Follow Us
  • Jagannath Rath Yatra 2025 images
    1/9

    पुरी, ओडिशा हे पवित्र शहर २०२५ च्या जगन्नाथ रथयात्रेच्या उत्साहात न्हालं आहे. ‘पहांडी’ या पारंपरिक विधीने श्रीजगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा या देवतांची भव्य मिरवणूक सुरू झाली आहे. मंदिराच्या गर्भगृहातून रथापर्यंत त्यांची ने-आण रंगतदार वातावरणात पार पडत आहे.
    पुरीपुरता हा उत्सव मर्यादित नाही—प्रयागराज, अहमदाबाद, पश्चिम बंगालसह अनेक ठिकाणी “जय जगन्नाथ!”चा जयघोष घुमतोय. ओडिसी आणि लोकनृत्यांनी सजलेले सांस्कृतिक कार्यक्रमही लक्ष वेधून घेत आहेत.
    लाखो भाविकांच्या सुरक्षिततेसाठी १०,००० हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात असून, एआयच्या मदतीने व्यवस्थापन अधिक बळकट करण्यात आलं आहे. आज भारतभर रस्ते रंग, भक्ती आणि परंपरेच्या उत्सवाने उजळून निघाले आहेत.

  • 2/9

    पुरीमध्ये २७ जून २०२५ रोजी रथयात्रेच्या आधी भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचे भव्य रथ सजवले गेले. संपूर्ण शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. (छायाचित्र स्रोत: X)

  • 3/9

    रथयात्रेच्या पूर्वसंध्येला पुरीतील सेवक रथांवर घुमट बसवण्याचे पवित्र काम करीत आहेत. हे दृश्य पाहण्यासाठी हजारो भक्त एकत्र जमले आहेत. (छायाचित्र स्रोत: पीटीआय)

  • 4/9

    पुरीतील जगन्नाथ मंदिरात रथयात्रा सुरू होण्यापूर्वीच भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या रथांची खास सजावट केली जात आहे. मंदिर परिसर उत्साहाने फुलून गेला आहे. (छायाचित्र स्रोत: पीटीआय)

  • 5/9

    पश्चिम बंगालमधील शांतीपूर येथेही भक्तिमय वातावरण! येथे भाविकांनी भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती रथात बसवून उत्सवात भाग घेतला आहे. (छायाचित्र स्रोत: पीटीआय)

  • 6/9

    पुरीतील जगन्नाथ मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी पाहता, रथाजवळ सुरक्षा कर्मचारी कडेकोट बंदोबस्त ठेवत आहेत. प्रशासन सजग असून वातावरण भक्तिभावाने भरले आहे. (छायाचित्र स्रोत: पीटीआय)

  • 7/9

    अहमदाबादची रथयात्रा :
    गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी अहमदाबादमधील १४८ व्या भगवान जगन्नाथ रथयात्रेला हिरवा झेंडा दाखवण्यापूर्वी पारंपरिक ‘पहिंद’ विधीमध्ये सहभाग घेतला. त्यांनी सोन्याचा झाडू घेऊन मुख्य रथासमोर पूजाअर्चा केली. (छायाचित्र स्रोत: पीटीआय)

  • 8/9

    प्रयागराजमध्ये रथयात्रेची धूम :
    प्रयागराजमध्ये शुक्रवारी पार पडलेल्या रथयात्रा उत्सवात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले. भजन, कीर्तन आणि मिरवणुकांनी सारा परिसर भक्तिमय झाला होता. (छायाचित्र स्रोत: पीटीआय)

  • 9/9

    पुरीतील वाळू कलाकृतीचं आकर्षण :
    पुरीमध्ये गुरुवारी रथयात्रेनिमित्त प्रसिद्ध वाळू कलाकार मानस कुमार साहू यांनी सुंदर वाळू शिल्प साकारले. त्यांच्या कलाकृतीने भाविकांचे लक्ष वेधले.

TOPICS
ट्रेंडिंगTrending

Web Title: Jai jagannath rath yatra 2025 celebrations puri prayagraj ahmedabad bangal svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.