-
२७ जून २०२५ रोजी भगवान जगन्नाथाची भव्य रथयात्रा संपन्न झाली. या दरम्यान लाखो भाविक पुरी येथे पोहोचले. (Photo: PTI)
-
पुरीच्या रस्त्यांवर भगवान जगन्नाथाच्या भक्तांचा पूर आल्यासारखे वाटत होते. (Photo: PTI)
-
पण तुम्हाला माहिती आहे का, यात्रेनंतर भगवान जगन्नाथांचा रथ कुठे जातो, तो पुढील वर्षासाठी सुरक्षित ठेवला जातो का? चला जाणून घेऊया. (Photo: PTI)
-
भगवान जगन्नाथाचा रथ बांधण्यासाठी खूप वेळ जतो. भगवान जगन्नाथाचा रथ बांधण्यासाठी फासी, ढोरा, सिमली, सहजा आणि माही आणि दारुक नावाच्या झाडांच्या लाकडाचा वापर केला जातो. रथयात्रेच्या आधी तो बनवण्याची प्रक्रिया सुरू होते. (Photo: PTI)
-
या रथयात्रेत तीन रथ बनवले जातात, त्यापैकी एक भगवान बलदेव, दुसरा राणी सुभद्रा आणि तिसरा भगवान जगन्नाथ महाप्रभूंचा असतो आणि ते याच क्रमाने पुढे सरकतात. (Photo: PTI)
-
पुरी रथयात्रेदरम्यान, भगवान जगन्नाथ, त्यांचा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्या रथांना नंदीघोष (१६ चाके), तलध्वज (१४ चाके) आणि दर्पदलन पद्म (१२ चाके) बसवले जातात. (Photo: PTI)
-
भगवान जगन्नाथांची रथयात्रा पूर्ण झाल्यानंतर, रथ सुरक्षितपणे ठेवले जातात. त्याचबबरोबर त्यांचे लाकूड शुभकार्यांसाठी वापरले जाते. (Photo: PTI)
-
रथाचे काही लाकूड भगवान जगन्नाथ मंदिराच्या स्वयंपाकघरात प्रसाद बनवण्यासाठी देखील वापरले जाते आणि दरवर्षी रथयात्रेसाठी एक नवीन रथ बनवला जातो. (Photo: PTI)
रथयात्रेनंतर भगवान जगन्नाथाच्या रथाचे काय केले जाते? तो कसा बनवला जातो, किती चाके असतात?
भगवान जगन्नाथाच्या मूर्तीसह त्यांचा रथही खूप भव्य असतो. अनेक लोक मिळून हा रथ अनेक दिवस आधीच बनवण्याची तयारी करत असतात. रथयात्रेनंतर रथाचे काय होते याबद्दल आपण जाणून घेऊयात..
Web Title: Jagannath rath yatra 2025 what happens to the rath after festival spl