-
बल्गेरियातील नेत्रहीन वांगेलिया पांडवा गुश्तेरोवा उर्फ बाबा वंगा फकीर या एक जगप्रसिद्ध ज्योतिष होत्या. भविष्यवाणी करणाऱ्या बल्गेरियन अंध दिव्यदृष्टीनी बाबा वेंगा यांची अनेक भाकितं आजही खरी ठरत आहेत.
-
त्यांनी २०२५ साली अनेक घटनांची अचूक भाकितं केली असून, त्यातील एक आनंदाची बातमी काही निवडक राशींशी संबंधित आहे. २०२५ हे अर्ध वर्ष संपले असून आता पुढचे सहा महिने शिल्लक उरले आहेत.
-
बाबा वेंगांनी सांगितले आहे की, २०२५ वर्षातील पुढचे सहा महिने काही राशींसाठी सोन्याच्या संधी घेऊन येणार आहे. या राशींच्या लोकांना अपार संपत्ती, यश आणि समाजात मान सन्मान मिळणार आहे. येत्या सहा महिन्यांतच हे लोक गडगंज श्रीमंत होऊ शकतात, असं त्यांचं स्पष्ट भाकीत आहे, चला तर कोणत्या या राशी आहेत, पाहूयात…
-
बाबा वेंगांच्या म्हणण्यानुसार, पुढचे सहा महिने वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे. तुम्ही ज्यासाठी अनेक वर्ष मेहनत करत होतात, ते सर्व स्वप्नं आता पूर्ण होणार. आर्थिक स्थैर्य मिळेल, मोठ्या प्रमाणात पैसे हातात येतील, करिअरमध्ये झपाट्याने यश मिळेल. गुंतवणुकीतूनही प्रचंड फायदा होण्याची शक्यता आहे.
-
बाबा वेंगा यांनी केलेल्या भाकितानुसार, मिथुन राशीच्या लोकांसाठी पुढचे सहा महिने एकामागून एक संधी घेऊन येणार आहे. मनातील अनेक मोठ्या इच्छा या काळात पूर्ण होऊ शकतात. जीवनात आनंद, समाधान आणि समृद्धी नांदेल. अचानक आर्थिक लाभ होईल, आणि नवीन ओळखी तुमच्यासाठी फायद्याच्या ठरतील. काही मोठ्या व्यवहारांमधून जबरदस्त यश मिळेल.
-
बाबा वेंगा यांनी केलेल्या भाकितानुसार, सिंह राशीच्या लोकांना पुढल्या सहा महिन्यात मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे या काळात परत मिळू शकतात. व्यवसायात आणि नोकरीतून मोठा फायदा होऊ शकतो. मानसिक तणाव कमी होईल, आणि आत्मविश्वासात वाढ होईल. येत्या दिवसात तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडू शकतात.
-
बाबा वेंगा यांनी केलेल्या भाकितानुसार, कुंभ या राशीसाठी येणारे सहा महिने फायदेशीर ठरु शकतात. शनीची दशा बदलल्यामुळे अचानक आर्थिक लाभ होईल. प्रमोशन, मोठे प्रोजेक्ट्स किंवा नेतृत्वाची भूमिका तुमच्याकडे येऊ शकते. गुंतवणूक फायदेशीर ठरेल आणि तुम्हाला समाजात एक वेगळी ओळख मिळेल.
-
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
-
(फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
बाबा वेंगांचं भाकित! पुढल्या ६ महिन्यांत ‘या’ चार राशी होणार गडगंज श्रीमंत? मिळणार ऐश्वर्य अन् धन-संपत्ती!
Baba Vanga Predictions: बाबा वेंगांचं भाकीत खरे ठरले तर… पुढचे ६ महिने ‘या’ राशींसाठी ठरणार स्वप्नवत!
Web Title: Baba vangas 2025 prediction these 4 zodiac signs could get rich in just 6 months pdb