• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. look rich or be rich startup founder highlights middle class struggle aam

श्रीमंत दिसावं की खरंच श्रीमंत व्हावं? स्टार्टअप फाउंडरची मध्यमवर्गीयांच्या मानसिकतेवरील पोस्ट चर्चेत

Middle Class: एकेकाळी, मध्यमवर्ग हा समाजाचा कणा मानला जात असे, कुटुंबे स्थिर नोकऱ्यांचा आनंद घेत असत, दुचाकी ते कार पर्यंत विकसित होत असत, वार्षिक सुट्ट्या घेत असत आणि घराची स्वप्ने पूर्ण करत असत.

July 1, 2025 14:08 IST
Follow Us
  • Look Rich or Be Rich Startup Founder Highlights Middle Class dilemma
    1/9

    एकेकाळी मध्यमवर्ग हा समाजाचा कणा मानला जात असे, कुटुंबे स्थिर नोकऱ्यांचा आनंद घेत होती, दुचाकींपासून कारकडे वळत होती, पर्यटनास जात होती आणि घराची स्वप्नेही पूर्ण करत होती.

  • 2/9

    पण परिस्थिती वेगाने बदलत आहे. संस्थापक आणि सीईओ श्याम अच्युतन म्हणतात की, मध्यमवर्ग दोन विरुद्ध दिशेने खेचला जात आहे, संपत्तीकडे किंवा चिंताकडे. आता कोणताही मध्यम मार्ग राहिलेला दिसत नाही.

  • 3/9

    त्यांनी लिंक्डइनवर लिहिले आहे की, “एकेकाळी मध्यमवर्ग हा समाजाचा कणा होता. स्थिर नोकऱ्या असलेली कष्टकरी कुटुंबे, दुचाकी वाहनांचे कारमध्ये रूपांतर करायचे, वार्षिक सुट्ट्या घ्यायचे आणि घराचे स्वप्नही पूर्ण करायचे. पण ते दिवस झपाट्याने नाहीसे होत आहेत.”

  • 4/9

    “आज, मध्यमवर्ग एका धोकादायक मार्गावर आहे. जो एकतर संपत्तीकडे किंवा चिंतांकडे घेऊन जातो. आता कोणताही मध्यम मार्ग नाही”, असे ते पुढे म्हणाले.

  • 5/9

    आज, मध्यमवर्गीय लोक श्रीमंत होण्याऐवजी श्रीमंत असल्याचे दाखवण्यात व्यस्त आहेत. महागड्या गॅझेट्स, फॅन्सी ब्रंच आणि ट्रेंडी सुट्ट्यांवप बहुतेकदा कर्ज आणि ईएमआयद्वारे खर्च करतात.

  • 6/9

    “ईएमआयवर घेतलेल्या आयफोनपासून ते जास्त किमतीच्या ब्रंचपर्यंत, आजचा मध्यमवर्ग श्रीमंत होण्याऐवजी श्रीमंत असल्याचे दाखवण्यासाठी उत्सुक आहे”, असेही अच्युतन यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

  • 7/9

    श्याम अच्युतन यांनी याला, “‘सर्वोत्तम जीवन जगण्याचा’ पोशाख घालून आर्थिक आत्महत्या” असे म्हटले आहे. या वर्तनामुळे, बहुतेकदा व्यक्ती वर्तमानात दिखावा करण्यासाठी त्यांच्या भविष्याविरुद्ध कर्ज घेतात.”

  • 8/9

    पण, यांच्यातील काही निवडक लोक वेगळा दृष्टिकोन स्वीकारत आहेत. “मध्यमवर्गातील काही लोक काहीतरी वेगळे आणि शक्तिशाली करत आहेत”, असे निरीक्षण त्यांनी केले आहे.

  • 9/9

    हे लोक महागडे खर्च सोडून देत आहेत, वापरलेल्या कार किंवा सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडत आहेत आणि आणि सातत्याने गुंतवणूक करत आहेत. “ते आता गरीब दिसत असतील, परंतु त्यांचे पैसे शांतपणे ओव्हरटाईम करत आहेत”, असे त्यांनी शेवटी नमूद केले आहे. (सर्व फोटो सौजन्य: Canva)

TOPICS
आईMotherपगारSalaryपालकParentsपालकत्वParentingमुलेChildren

Web Title: Look rich or be rich startup founder highlights middle class struggle aam

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.