-
२ जुलै २०२५ रोजी अमरनाथ यात्रेसाठी निघालेल्या पहिल्या यात्रेकरूंचा गट अनंतनागमधील नुनवान बेस कॅम्पवर पोहोचला. यात्रेचा उत्साह आणि भक्तीचा माहोल पाहायला मिळाला. (प्रतिमा स्रोत: पीटीआय)
-
३ जुलै २०२५ रोजी गंदरबल जिल्ह्यातील बालताल बेस कॅम्पमधून यात्रेकरूंचा पहिला गट अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाला. भाविकांमध्ये भक्तिभाव आणि उत्साह दिसून आला. (प्रतिमा स्रोत: पीटीआय)
-
३ जुलै रोजी पहलगामच्या नुनवान बेस कॅम्पमधून यात्रेकरू निघताना सुरक्षा अधिकारी दक्षतेने पहारा देताना दिसले. यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (प्रतिमा स्रोत: पीटीआय)
-
२ जुलै रोजी श्रीनगरच्या पंथा चौक बायपासवर अमरनाथ यात्रेच्या पहिल्या गटाचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यात्रेकरूंचा उत्साह ओसंडून वाहत होता. (प्रतिमा स्रोत: आयएएनएस)
-
श्रीनगरच्या पंथा चौक येथील नोंदणी केंद्राबाहेर २ जुलै रोजी सुरक्षा दलांनी स्निफर डॉग्सच्या मदतीने वाहनांची तपासणी केली. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. (प्रतिमा स्रोत: IANS)
-
श्रीनगरच्या पंथा चौक येथील यात्री निवासात अमरनाथ यात्रेसाठी भाविक पोहोचू लागले आहेत. भक्तिभावाने भारलेले हे वातावरण सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. (प्रतिमा स्रोत: IANS)
-
नोंदणीसाठी आलेले भाविक शांतपणे रांगेत उभे राहून आपली वेळ येण्याची प्रतीक्षा करत आहेत. व्यवस्थाही सुरळीतपणे सुरू आहे. (प्रतिमा स्रोत: आयएएनएस)
-
पहलगामजवळील नुनवान बेस कॅम्पवर यात्रेकरूंच्या आगमनावेळी सुरक्षा कर्मचारी सतर्कपणे पहारा देताना दिसले. भाविकांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता ठेवली जात आहे. (प्रतिमा स्रोत: पीटीआय)
-
नुनवान बेस कॅम्पवर पहिला भाविकांचा गट पोहोचल्याने यात्रेला अधिकृत सुरुवात झाली आहे. परिसर भक्तिभावाने न्हालेला आहे. (प्रतिमा स्रोत: पीटीआय)
-
यात्रेचा पहिला गट रवाना होताना सुरक्षेची कडी राखण्यात आली. प्रत्येक टप्प्यावर पोलिस आणि सुरक्षा कर्मचारी तयार आहेत. (प्रतिमा स्रोत: पीटीआय)
Photos: कडक बंदोबस्तात अमरनाथ यात्रा सुरू; पाहा पहिल्या दिवसाचे खास क्षण!
वार्षिक अमरनाथ यात्रेला २ जुलै २०२५ पासून सुरुवात झाली असून, पहिला भाविकांचा गट नुनवान आणि बालताल बेस कॅम्पवर पोहोचला आहे. श्रीनगरमधील नोंदणी केंद्रांवर भाविकांची गर्दी दिसून आली, तर सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहेत. यात्रेच्या प्रत्येक टप्प्यावर भक्तिभाव, उत्साह आणि कडक सुरक्षा व्यवस्थेचं वातावरण पाहायला मिळत आहे.
Web Title: Amarnath yatra 2025 starts from nunwan and baltal with security photos svk 05