• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. nitin gadkari on delhi pollution said not stay in delhi more than 2 3 days spl

“मी दिल्लीमध्ये फक्त २-३ दिवसच राहतो” नितीन गडकरी असे का म्हणाले?

ते दिल्लीतील गौतम बुद्ध नगरमधील ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Updated: July 9, 2025 12:11 IST
Follow Us
  • Nitin Gadkari speech on doctors healthcare sensitivity in india at Sobati book launch event Nagpur
    1/9

    केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी दिल्लीच्या प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. (संग्रहित फोटो)

  • 2/9

    काल (८ जुलै) एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी सांगितले की ते दिल्लीत येण्यापूर्वीच त्यांचे परत जाण्याचे तिकीटही बुक करतात. प्रदूषण कमी करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असेही त्यांनी सांगितले. (संग्रहित फोटो)

  • 3/9

    ते दिल्लीतील गौतम बुद्ध नगरमधील ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. (संग्रहित फोटो)

  • 4/9

    काय म्हणाले गडकरी?
    ‘मी दिल्लीत फक्त दोन किंवा तीन दिवसच राहतो आणि जेव्हा जेव्हा मी येतो तेव्हा मी कधी परत जाईन याचाच विचार करतो. मी माझे परतीचे तिकीट आधीच बुक करतो. तुम्ही माझे म्हणणे गांभीर्याने घ्या. दिल्लीतील प्रदूषणामुळे लोकांचे आयुर्मान कमी झाले आहे.” (संग्रहित फोटो)

  • 5/9

    इथेनॉलसारख्या पर्यायी इंधनांचा वापर व मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहिमांद्वारे प्रदूषण प्रभावीपणे कमी करता येऊ शकते. सरकार या दोन्हींवर सक्रियपणे काम करत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (संग्रहित फोटो)

  • 6/9

    रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणाले की, सरकार रस्ते बांधणी करण्यासाठी कचऱ्याचाही वापर करत आहे आणि यासाठी सुमारे ८० लाख टन कचरा वापरण्यात आला आहे. गडकरी म्हणाले, “महामार्गांवर पावसाचे पाणी झिरपण्यासारखे उपाय अवलंबून जलसंवर्धनालाही प्राधान्य देत आहोत.” (संग्रहित फोटो)

  • 7/9

    सरकारने जारी केलेल्या एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, एनएचएआय सध्या बांबू लागवड, दाट वृक्षारोपण आणि ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. (संग्रहित फोटो)

  • 8/9

    त्यामध्ये पुढे म्हटले आहे की, एनएचएआयने २०२४-२५ दरम्यान ६० लाख वृक्षारोपणाच्या उद्दिष्ट असताना सुमारे ६७ लाख झाडे लावली आहेत. (संग्रहित फोटो)

  • 9/9

    (संग्रहित फोटो) हेही पाहा- सौरव गांगुलीच्या लेकीला पाहिलंत का? कोलकात्यातील शाळा ते लंडनमधून पदवी; ‘या’ श्रेत्रात करतेय काम…

TOPICS
नितीन गडकरीNitin Gadkariप्रदूषणPollution

Web Title: Nitin gadkari on delhi pollution said not stay in delhi more than 2 3 days spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.