-
न्यू यॉर्क शहरात १.६ कोटी रुपयांचा पगार खरोखर पुरेसा आहे का? गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर भारतीय तरुणी मैत्री मंगलचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तिने तिच्या मासिक खर्चाचा तपशील सांगितला आहे.
-
पॉडकास्टर आणि लेखक कुशल लोढा यांच्यासोबतच्या एका व्हिडिओत, मैत्री मंगलने तिच्या मानधनाबद्दल आणि अमेरिकेतील मासिक खर्चाबद्दल चर्चा केली.
-
“गुगलमध्ये सरासरी पॅकेज किती आहे? मी गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या मैत्रीला विचारले. यावर तिने सांगितले की, वेगवेगळ्या पदांसाठी साधारणपणे १.६ कोटी रुपये आहे”, असे लोढा यांनी त्यांच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
-
पण प्रेक्षकांना ज्या गोष्टीने आकर्षित केले ते म्हणजे न्यू यॉर्कमधील मैत्री मंगलच्या मासिक बजेटचे तपशील, कारण हे शहर जगातील सर्वात महागड्या शहरांमध्ये गणले जाते.
-
तिच्या अपार्टमेंटमध्ये उभी राहून, मैत्रीने सांगितले की, ती दरमहा सुमारे ४.२ लाख रुपये खर्च करते, यातील अंदाजे २.५ लाख रुपये केवळ घराच्या भाड्यावरच खर्च होतात.
-
बाहेर खाणे, किराणा सामान आणि मनोरंजन यासह तिचा दैनंदिन खर्च अंदाजे ८५,६८४ ते १,७१,३६८ रुपये इतका आहे तर वाहतुकीचा खर्च अंदाजे ८,५६८ ते १७,१३६ रुपये इतका आहे.
-
पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये, अनेक युजर्सनी न्यू यॉर्कसारख्या जागतिक शहरात मोठे पगार पॅकेज आणि वास्तविक खर्चामधील अत्यंत कमी फरक यावर चर्चा केली आहे.
-
“त्यांना त्यांच्या पगारासोबत कर आणि आरोग्य विम्याबद्दल विचारले पाहिजे आणि जर लोक डॉलरमध्ये कमावतात तर तुम्ही फक्त डॉलर्स खर्च करावेत, रुपयात नाही,” असे एका युजरने लिहिले आहे.
-
मैत्री मंगल, इंस्टाग्रामवर तंत्रज्ञानाशी संबंधित व्हिडिओ देखील पोस्ट करते, तिचे इंस्टाग्रामवर १.७३ हजार फॉलोअर्स आहेत. (All Photos: Maitri Mangal/Instagram)
Maitri Mangal: गुगलमध्ये नोकरी, १.६ कोटी रुपये पगार… तरीही भारतीय तरुणी म्हणते, “न्यूयॉर्कमध्ये ४ लाख रुपये…”
Maitri Mangal Salary: पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये, अनेक युजर्सनी न्यू यॉर्कसारख्या जागतिक शहरात मोठे पगार पॅकेज आणि वास्तविक जगाच्या खर्चामधील अत्यंत कमी फरकावर चर्चा केली आहे.
Web Title: Maitri mangal indian google engineer earning rs 1 crore 60 lakhs reveals monthly expenses in new york aam