-
भारतीयांना समोसा आणि जिलेबीचे प्रचंड वेड आहे. सध्या या दोन्ही पदार्थांची चर्चा संपूर्ण देशात होत आहे. चर्चेचे नवे कारण आरोग्य मंत्रालयाचा आदेश आहे. मंत्रालयाने सर्व केंद्रीय संस्थांना असे फलक आणि पोस्टर्स लावण्याचे आदेश दिले आहेत जे समोसा आणि जिलेबीसारख्या रोजच्या नाश्त्यात किती फॅट आणि साखर असते हे सांगतील. ही चेतावणी अगदी तंबाखूबाबत जारी केलेल्या सूचनांसारखीच असणार आहे आणि इशारा लिहिलेला असणार आहे. त्याची सुरूवात महाराष्ट्रातील नागपूरपासून होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Photo: Meta AI)
-
समोसा आणि जिलेबीची खरी मुळे
भारतीय पदार्थांबद्दल बोलताना समोसा आणि जिलेबीचा उल्लेख न करणे अशक्य आहे. हे पदार्थ केवळ भारतातच नाही तर जगभरात लोकप्रिय आहेत. लोक त्यांना भारतीय पदार्थ म्हणूनच ओळखतात, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण ज्या पदार्थाला भारतीय मानतो ते खरोखर भारताशी संबंधित आहे की नाही? (Photo: Meta AI) -
आज आपण या दोन लोकप्रिय पदार्थांची कहाणी जाणून घेणार आहोत ज्यांचे मूळ भारतातील नाही. (Photo: Meta AI)
-
समोशाची गोष्ट
आज भारताच्या कानाकोपऱ्यात समोसा उपलब्ध आहे. शाळेबाहेरची दुकाने असोत किंवा रेल्वे स्टेशन, समोसा सर्वत्र उपलब्ध आहे. पण सत्य हे आहे की समोसा भारतीय पदार्थ नाही. (Photo: Meta AI) -
त्याचे सुरुवातीचे नाव ‘सांबुसक’ या पर्शियन शब्दावरून आले आहे आणि ही डिश मूळतः इराणमधली आहे. त्याठिकाणी त्यामध्ये किसलेले मांस भरून त्याला बनवले जात होते, परंतु भारतात आल्यानंतर त्याला बटाटे, वाटाणे, पनीर आणि मसाल्यांनी एक नवीन रूप मिळाले. (Photo: Meta AI)
-
जलेबीचा गोडवाही विदेशी
भारतात जिलेबी ही सण आणि आनंदी क्षणांची गोडवा मानली जाते. पण तिचाही उगम भारतातला नाही. तिचा इतिहास मध्य पूर्वेशी जोडलेला आहे. (Photo: Meta AI) -
‘किताब अल तबीख’ या अरबी पाककृती पुस्तकात ‘जलेबीह’ नावाच्या गोड पदार्थाचा उल्लेख आहे, जो आजच्या जिलेबीसारखाच होता. (Photo: Meta AI)
-
बिहार आणि उत्तर प्रदेशचा समोसा सर्वात प्रसिद्ध
समोसा प्रत्येक राज्यात उपलब्ध असला तरी, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये त्याची चव सर्वोत्तम मानली जाते. येथील व्यावसायिकांनी समोशाला एक नवी चव दिली आहे. (Photo: Meta AI) -
परदेशी पदार्थ, भारतीय ओळख
समोसा आणि जलेबी सारखे पदार्थ भारताने शोधले नसले, तरी भारतीयांनी ते अशा प्रकारे स्वीकारले आहेत की ते आता देशाची ओळख बनले आहेत. (Photo: Meta AI) हेही पाहा- Photos: पाकिस्तानमधील महादेव मंदिरांची खासियत; गाभाऱ्यातील फोटो पाहिलेत का?
समोसा, जिलेबी हे पदार्थ ‘या’ मुस्लिम देशांतून भारतात आले; यांच्याबाबत तंबाखू विरोधासारखे फलक लागणार
भारतात प्रचंड लोकप्रिय असलेले समोसा आणि जिलेबी हे पदार्थ प्रत्यक्षात मात्र भारतीय नाहीत. आज ते भारतीय खाद्यसंस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत. ते कुठून आले ते जाणून घेऊयात.
Web Title: Samosa jalebi belong to these muslim countries know the food history india health ministry latest alert spl