-
नागपूरच्या टपरीवरून संपूर्ण भारतात झळकणारा ब्रँड नागपूरच्या एका छोट्याशा चहाच्या गाड्यावर चहा विकणाऱ्या डॉली चायवालाने आपल्या अनोख्या स्टाईल आणि आत्मविश्वासाच्या जोरावर संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. आता याच डॉलीने चहाच्या फॅंचायझीचा मोठा प्रवास सुरू केला आहे.
-
‘डॉली की टपरी’चा देशव्यापी विस्तार डॉली चायवालाने ‘डॉली की टपरी’ या नावाने एक फॅंचायझी मॉडेल सुरू केलं असून, अल्प गुंतवणुकीपासून मोठ्या कॅफेपर्यंत तीन स्तरांमध्ये हे व्यवसाय मॉडेल उपलब्ध आहे. एकाच ब्रँडच्या छत्राखाली चहाची नवी क्रांती सुरू झाली आहे.
-
फक्त दोन दिवसांत तब्बल १६०० अर्ज या फॅंचायझी मॉडेलला लोकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. डॉलीच्या म्हणण्यानुसार, फक्त दोन दिवसांत १६०९ जणांनी फॅंचायझीसाठी अर्ज केले असून, यातून चहा उद्योगातली नव्या युगाची शक्यता दिसते.
-
छोट्या गुंतवणुकीत मोठा व्यवसाय ‘कार्ट स्टॉल’ ₹४.५ ते ₹६ लाखात, ‘स्टोअर मॉडेल’ ₹२० ते ₹२२ लाखांत, आणि ‘फ्लॅगशिप कॅफे’ ₹३९ ते ₹४३ लाखांपर्यंत सुरू करता येणार आहे. प्रत्येक स्तरावर विशिष्ट सुविधा आणि ब्रँडिंग दिले जात आहे.
-
डॉलीचा भावनिक प्रवास डॉली म्हणतो, “मी शाळा शिकू शकलो नाही, पण चहा विकत विकत जग शिकलो. मी हार मानली नाही.” त्याचा हा प्रवास एक यशोगाथा बनला आहे, जो तरुणांना स्वप्न पाहण्याची प्रेरणा देतो.
-
सोशल मीडियावरून ग्लोबल प्रसिद्धी बिल गेट्सला चहा दिल्यामुळे डॉली चायवाला एका रात्रीत प्रसिद्ध झाला. त्याच्या व्हिडीओंनी सोशल मीडियावर लाखो लोकांची मनं जिंकली. त्याच लोकप्रियतेला व्यवसायिक रूप देण्याचा त्याचा प्रयत्न आता खऱ्या अर्थाने यशस्वी ठरत आहे.
-
नेटिझन्सचा प्रतिसाद संमिश्र या निर्णयावर काही लोकांनी अभिनंदन करत डॉलीला ‘नव्या भारताचा चहा उद्योजक’ म्हटलं आहे, तर काहींनी “शिक्षणावर अवलंबून न राहता यश मिळू शकतं” असं म्हणत चर्चा निर्माण केली आहे.
-
स्ट्रीट टू स्टार्टअप डॉली चायवालाचा प्रवास फक्त चहाच्या कपापुरता मर्यादित नाही. त्याने एका स्ट्रीट स्टार्टअपने उद्योजकतेची नवी व्याख्या दिली आहे. या योजनेतून अनेकांना रोजगार, सन्मान आणि ओळख मिळू शकते.
नागपूरच्या डॉली चहावालाने आणलं त्याचं फ्रँचायझी मॉडेल; तीन पर्यायांसह सांगितला प्लॅन, वाचा…
डॉली चायवाला आता फक्त टपरीपुरता मर्यादित राहिलेला नाही. ‘डॉली की टपरी’ फॅंचायझीला अवघ्या दोन दिवसांत १६०० अर्ज मिळाले आणि त्याचा संघर्ष आता प्रेरणादायक यशात बदलला आहे.
Web Title: Nagpur dolly chaiwala launches franchise model with three options full plan svk 05