-
देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Cm Devendra fadanvis) यांना देशामधल्या सर्वात हुशार नेत्यांपैकी एक मानले जाते. (Photo: Devendra Fadanvis/Instagra) -
ते ५ डिसेंबर २०२४ पासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत आणि यापूर्वी त्यांनी २०१४ ते २०१९ पर्यंत दोन वेळा हे पद भूषवले आहे. (Photo: Devendra Fadanvis/Instagram)
-
पत्नी अमृता फडणवीस
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta fadanvis) याही नेहमी चर्चेत राहतात, त्यामागे वेळोवेळी विविध कारणे असतात. पण, आज आपण त्यांच्याबद्दलची सखोल माहिती (Deep Information) जाणून घेणार आहोत, जी माहिती आपल्यातील अनेकांना कदाचित माहित नसेल…. (Photo: Devendra Fadanvis/Instagram) -
अमृता फडणवीस
४५ वर्षीय अमृता फडणवीस यांचा जन्म ९ एप्रिल १९७९ रोजी नागपूर येथे झाला. त्यांचे वडील शरद रानडे (Sharad Ranade) नेत्ररोगतज्ज्ञ आहेत तर आई चारुलता रानडे (Charulata Ranade) या स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. (Photo: Amruta Fadanvis/Instagram) -
शिक्षण
अमृता यांनी नागपूर येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमधून (Saint Josef School) सुरूवातीचे शिक्षण घेतले. त्यांनी नागपूरच्या जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून (G.S. College Of Commerce and Economics) पदवी प्राप्त केली. तसेच त्यांनी पुणे येथील सिम्बायोसिस लॉ स्कूलमधून (Symbiosis Law School) टॅक्सेशन लॉ व एमबीएचे शिक्षण घेतले आहे. (Photo: Amruta Fadanvis/Instagram) -
शास्त्रीय संगीत
याशिवाय त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षापासून शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतले आहे. (Photo: Amruta Fadanvis/Instagram) -
टेनिस
अमृता या १६ वर्षांखालील राज्यस्तरीय टेनिसपटू (Tennis player) खेळाडूही राहिल्या आहेत. (Photo: Amruta Fadanvis/Instagram) -
सामाजिक काम
विविध सामाजिक कार्यक्रमातही (Social Work) त्यांनी सहभाग घेतला आहे. (Photo: Amruta Fadanvis/Instagram) -
लग्न
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांचा विवाह २००५ साली झाला. (Photo: Amruta Fadanvis/Instagram) -
कुटुंब
त्यांच्या लग्नाला २० वर्षे (20 years) झाली असून त्यांना दिविजा (Divija fadanvis) नावाची एक मुलगी आहे. ती सध्या १८ (18 Years) वर्षांची आहे. (Photo: Amruta Fadanvis/Instagram) -
काम
२००३ मध्ये त्यांनी अॅक्सिस बँकेत (Axix Band) एक्झिक्युटिव्ह कॅशियर (Executive Cashier) म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्याच बँकेच्या नागपूरातील व्यवसाय शाखेचे प्रमुख म्हणून काम पाहिले. अमृता फडणवीस या गेल्या १७ वर्षांहून अधिक काळ ॲक्सिस बँकेत कार्यरत आहेत. जानेवारी २०१५ मध्ये त्यांना याच बँकेच्या वरळी, मुंबई येथील कॉर्पोरेट कार्यालयात (Corporate office) नियुक्त करण्यात आले होते. सध्या त्या याच बँकेच्या उपाध्यक्षपदी (Vice president) काम करत आहेत. (Photo: Amruta Fadanvis/Instagram) -
आवड
त्यांना संगीताची (Music) आवड आहे. त्यांना विविध कार्यक्रमांमध्ये लाईव्ह (Live Performance) तसेच अनेक व्यावसायिक आणि सामाजिक चित्रपटांसाठी (Movies) गाणी गायली आहेत. (Photo: Amruta Fadanvis/Instagram)
अमृता फडणवीस यांचं माहेरचं आडनाव काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta fadanvis) याही नेहमी चर्चेत राहतात, त्यामागे वेळोवेळी विविध कारणे असतात….
Web Title: Cm devendra fadanvis wife amruta fadanvis unknown facts in marathi whats her surname before marriage spl