-
२०२५ या वर्षामध्ये सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत सोन्यानं तब्बल २६ टक्क्यांची झेप घेतली आहे. ही वाढ केवळ गुंतवणूकदारांचं लक्ष वेधून घेत नाही, तर अनेक आर्थिक तज्ज्ञांचंही लक्ष केंद्रित करीत आहे. (फोटो सौजन्य : Pexels)
-
या वाढीमागील कारणं विविध आहेत. जागतिक महागाई, चलन घसरण, बँकिंग अनिश्चितता व युक्रेन-रशिया संघर्ष यांसारख्या गोष्टींमुळे गुंतवणूकदार ‘सेफ हेवन’ म्हणजेच सुरक्षित गुंतवणूक म्हणून पुन्हा सोन्याकडे वळताना दिसत आहेत. (फोटो सौजन्य : Pexels)
-
. भारतातही सोनं हे सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या संपत्तीचं महत्त्वाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे सोन्याच्या किमतीत झालेली वाढ ही देशांतर्गत गुंतवणुकीसाठी एक महत्त्वाचा संकेत मानला जात आहे. (फोटो सौजन्य : FreePik)
-
सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी आज विविध पर्याय उपलब्ध आहेत. पारंपरिक दागिन्यांच्या खरेदीपासून ते आधुनिक डिजिटल माध्यमांपर्यंत गुंतवणूकदारांकडे आज निवडण्याजोगे अनेक पर्याय आहेत. (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
दागिन्यांची खरेदी हा सर्वांत पारंपरिक पर्याय आहे. मात्र, यात ‘मेकिंग चार्ज’ आणि जीएसटीचा विचार करावा लागतो. सोन्याच्या शुद्धतेसाठी BIS हॉलमार्क असलेले दागिने निवडणे हेही आवश्यक आहे. (फोटो सौजन्य- Indian express)
-
डिजिटल गोल्ड खरेदी करणे हा नवीन पर्याय आहे. फोनपे, पेटीएम, गूगल पे यांसारख्या प्लॅटफॉर्मवरून सहजतेने सोने खरेदी करता येते. मात्र अशा गुंतवणुकीसाठी विश्वासार्ह प्लॅटफॉर्म आणि सुरक्षा तपासणे महत्त्वाचे आहे. . (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
. डिजिटल युगात गोल्ड ETF आणि SGB हे अधिक सुरक्षित पर्याय आहेत. एक्स्चेंज ट्रेडेड फंड (Gold ETF) म्हणजे शेअर बाजारातून डिजिटल स्वरूपात सोन्यात गुंतवणूक. तर Sovereign Gold Bonds (SGBs) हे भारत सरकारकडून जारी होतात आणि त्यावर निश्चित व्याजही मिळतं. (फोटो सौजन्य : freepik)
-
डिजिटल गोल्ड खरेदी करणे हा नवीन पर्याय आहे. फोनपे, पेटीएम, गूगल पे यांसारख्या प्लॅटफॉर्मवरून सहजतेने सोने खरेदी करता येते. मात्र अशा गुंतवणुकीसाठी विश्वासार्ह प्लॅटफॉर्म आणि सुरक्षा तपासणे महत्त्वाचे आहे. (फोटो सौजन्य : Pexels)
-
तज्ज्ञांचं मत आहे की, सोन्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, कोणतीही गुंतवणूक करताना आपल्या गरजा, कालावधी व जोखीम यांचा विचार करून योग्य पर्याय निवडणं हे अत्यंत आवश्यक आहे. (फोटो सौजन्य : freepik)
सोन्याचा दर अवघ्या सहा महिन्यांत २६% नी वाढला; गुंतवणुकीसाठी ‘हे’ पर्याय ठरू शकतात फायदेशीर
सोन्याच्या किमतीत अवघ्या सहा महिन्यांत तब्बल २६ टक्क्यांची झपाट्यानं वाढ झाली आहे. आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोनं पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय ठरत असून, तज्ज्ञांच्या मते ही तेजी यापुढेही कायम राहण्याची शक्यता आहे. सध्याची स्थिती गुंतवणुकीसाठी योग्य संधी मानली जात आहे.
Web Title: Gold investment options in india 2025 safe ways to invest in online and offline svk 05