-
सिलिकॉन व्हॅलीमध्ये एआय टॅलेंट वॉर सुरू असून, मार्क झुकरबर्ग यांची मेटा मेटा कंपनी त्यांच्या सुपरइंटेलिजेंस लॅबसाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील हुशार कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही. (फोटो: @mattdeitke/x)
-
एका अहवालानुसार, मेटा हुशार टॅलेंटला आकर्षित करण्यासाठी भरघोस कंपन्सेशन पॅकेजेस देत आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी २४ वर्षीय एआय संशोधक मॅट डायटक या तरुणाला २,१९६ कोटी रुपयांच्या कंपेन्सेशल पॅकेजची ऑफर दिली होती आणि ती त्याने स्वीकारली आहे. (फोटो: @mattdeitke/x)
-
द न्यू यॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, मॅट डायटक याने सुरुवातीला मेटाच्या सुमारे १०९८ कोटी रुपयांच्या ऑफरला नकार दिला होता. (फोटो: रॉयटर्स)
-
पण, त्याच्या नकारानंतर, झुकरबर्ग यांनी त्याच्याबरोबर वैयक्तिकरित्या समोरासमोर बैठक आयोजित केली आणि ऑफरमध्ये वाढ करत त्याला सुमारे २,१९६ रुपयांची नवी ऑफर दिली. (फोटो: रॉयटर्स)
-
मेटाच्या या ऑफरमुळे मॅट डायटक नेमका कोण आहे आणि झुकरबर्ग त्याला मेटाच्या सुपरइंटेलिजेंस प्रकल्पात आणण्याचा इतका निर्धार का केला आहे? याची सर्वत्र चर्चा होत आहे. (फोटो: रॉयटर्स)
-
डायटक हा एआय क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय आणि हुशार व्यक्तींपैकी एक असल्याचे मानले जाते. तो वॉशिंग्टन विद्यापीठात पीएचडीचा विद्यार्थी होता. त्यांने सिएटलमधील एलन इन्स्टिट्यूट फॉर एआय मधील वास्तविक जगातील एआय प्रगतीचा पाठपुरावा करण्यासाठी शिक्षण सोडले. (फोटो: रॉयटर्स)
-
पुढे मोल्मोचे नेतृत्व करताना डायटकने एक अत्याधुनिक मल्टीमोडल चॅटबॉट तयार केला, जो मजकूरासोबतच छायाचित्रे आणि ऑडिओवर प्रक्रिया करू शकतो. या उल्लेखनीय कार्यामुळे त्याला ‘NeurIPS २०२२’ या प्रतिष्ठित एआय परिषदेत उत्कृष्ट शोधनिबंधासाठी पुरस्कार मिळाला. (फोटो: रॉयटर्स)
-
एआय क्षेत्रात डायटक याच्या उल्लेखनीय कार्यानंतर, मेटा कंपनी २०२३ च्या उत्तरार्धापासून त्याला आपल्या कंपनीत सहभागी करून घेण्यासाठी इच्छुक होती. मात्र, डायटकने सुरुवातीला मेटाची आकर्षक ऑफर नाकारून व्हरसेप्टमध्ये स्वतःचे स्वायत्त एआय एजंट्स विकसित करण्याचे काम सुरू ठेवले. (फोटो: रॉयटर्स)
-
परंतु नंतर मार्क झुकरबर्ग यांचा वैयक्तिक सहभाग आणि वाढवलेला भरघोस मोबदला यामुळे अखेर डायटक याने मेटाच्या महत्त्वाकांक्षी सुपरइंटेलिजन्स लॅबमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. (फोटो: रॉयटर्स)
AI Researcher Matt Deitke Salary: २४ वर्षांच्या तरुणाला २२०० कोटी रुपयांची नोकरी; ११०० कोटी रुपयांची ऑफर नाकारली होती
AI Researcher Matt Deitke: डायटकने सुरुवातीला मेटाची आकर्षक ऑफर नाकारून व्हरसेप्टमध्ये स्वतःचे स्वायत्त एआय एजंट्स विकसित करण्याचे काम सुरू ठेवले.
Web Title: Mark zuckerberg offers 2196 cr rs salary to 24 year old ai researcher matt deitke meta aam