-
भारत नेहमीच त्याच्या खनिज संपत्तीसाठी आणि विशेषतः सोन्यासाठी जगभर प्रसिद्ध राहिला आहे. अलिकडेच, मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात सोन्याचा मोठा साठा सापडल्याची पुष्टी झाल्यामुळे देशातील सोन्याच्या साठ्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. सुरुवातीच्या काही सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की हा साठा सुमारे १०० हेक्टर क्षेत्रात पसरलेला आहे आणि त्यात लाखो टन सोने असू शकते. (Photo: Meta AI)
-
भूगर्भशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, महागवान केवलारी गावाजवळ सापडलेले हे सोने राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोठा बदल घडवून आणू शकते. यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील आणि देशाची आर्थिक स्थितीही मजबूत होईल. (Photo: Meta AI)
-
भारताकडील सोन्याचा साठा
सोने हे भारतीय संस्कृती आणि परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. लग्नापासून ते सणांपर्यंत नेहमीच त्याची मागणी होत असते. ३१ मार्च २०२५ पर्यंतच्या आकड्यांनुसार, भारताकडे अंदाजे ८७९.५८ मेट्रिक टन सोन्याचे साठे आहेत, यावरुन कळतं की भारत जगातील आघाडीच्या देशांपैकी एक आहे. (World Gold Council Data) (Photo: Meta AI) -
१.हुट्टी सोन्याची खाण, कर्नाटक
सुमारे २००० वर्षे जुनी असलेली ही खाण अजूनही कार्यरत आहे. येथून दरवर्षी सुमारे १.८ टन सोने काढले जाते. रायचूर जिल्ह्यातील हुट्टी सोन्याची खाण ही भारतातील सर्वात मोठी सोन्याची खाण आहे. (Photo: Meta AI) -
२.कोलार गोल्ड फील्ड्स (केजीएफ), कर्नाटक
१८८० मध्ये ब्रिटीश राजवटीत येथे खाणकाम सुरू झाले. २००१ पर्यंत ८०० टन सोने काढण्यात आले. सध्या ती बंद आहे, परंतु या खाणीला पुन्हा सुरू करण्याची योजना असल्याची माहिती आहे. (Photo: Meta AI) -
३.सोनभद्र, उत्तर प्रदेश
२०२० मध्ये येथे सोन्याचे साठे सापडले. या खाणीत जवळपास ७०० टन सोनं असेल अशी शक्यता व्यक्त केली जाते. ही खाण उत्तर प्रदेशसाठी सोन्याचे केंद्र बनू शकते. (Photo: Meta AI) -
४.रामगिरी, आंध्र प्रदेश
ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या क्षेत्रातली ही खाण प्रसिद्ध सोन्याच्या खाणींपैकी एक आहे, भविष्यात मोठ्या प्रमाणात सोने उत्पादन होऊ शकते. (Photo: Meta AI) -
५.चिगारगुंटा- बिसनाथम, आंध्र प्रदेश
हा प्रदेश सोन्याच्या चांगल्या संधींसाठी देखील ओळखला जातो, जो येणाऱ्या काळात देशाला सोन्याच्या पुरवठ्यात योगदान देईल. (Photo: Meta AI) -
भारतातील या खाणींवरून आणि अलिकडच्या काळात झालेल्या शोधावरून हे स्पष्ट होते की येत्या काळात देशाचे सोन्याचे साठे आर्थिक बळकटीकरण आणि रोजगारासाठी एक प्रमुख आधार बनू शकतात. (Photo: Meta AI) हेही पाहा- स्मरणशक्ती होईल तीक्ष्ण, अल्झायमरचं नो टेन्शन; मेंदूचं आरोग्य ठणठणीत ठेवणाऱ्या १० पदार्थांचा आहारात करा समावेश
देशाला हजारो टन सोनं देणाऱ्या भारतातल्या ५ सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणी कुठे आहेत? जाणून घ्या…
भारत हा सोन्याच्या बाबतीत कुठेही कमी नाही. अलिकडेच मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात सोन्याचे साठे सापडले आहेत. देशातील ५ प्रमुख मोठ्या सोन्याच्या खाणींबद्दल तुम्हाला माहिती आहे का? या खाणी देशाला आर्थिक बळकटी तर देतातच पण त्या रोजगाराचाही एक मोठा स्रोत आहेत.
Web Title: 5 biggest gold mines in india kolar hutti sonbhadra ramagiri gold field know the details spl