-
थकलेला; पण स्टायलिश!
‘टायर्ड गर्ल मेकअप’ हा लूक सोशल मीडियावर झपाट्याने लोकप्रिय होत आहे. नावाने जरी तो थकवा दाखवतोय असं वाटलं तरी हा लूक आहे अगदी सहज सुंदरतेचा उत्सव. -
परफेक्शन विसरा; नैसर्गिकतेला कवटाळा
हा ट्रेंड मेकअपमधल्या अपूर्णतेला स्टाईलमध्ये बदलतो. डोळ्यांखाली थोडा शॅडो, हलके ब्लश, साधा लूक—सगळं जसं आहे तसं! -
हलका बेस; मोठा इम्पॅक्ट
जड फाउंडेशनची गरज नाही. टिंटेड मॉइश्चरायझर, हलकासा कव्हर—त्वचेचा नैसर्गिक पोतच खरी ओळख ठरतो. -
डोळ्यांचा ‘अर्धवट’ ग्लॅम
या लूकमध्ये परफेक्ट विंग आयलायनर नकोच. त्याऐवजी थोडा स्मज्ड लाइनर आणि मऊ शॅडोज एक नैसर्गिक आकर्षण निर्माण करतात. -
लाली म्हणजे सौंदर्याचा स्पर्श
क्रीम ब्लशच्या हलक्या स्ट्रोक्समुळे चेहऱ्यावर येतो नुकताच चालून आल्यासारखा आरोग्यदायी लालसरपणा, ज्यात साधेपणाचं सौंदर्य चमकून दिसतं. -
बोल्ड नाही; मऊ ओठ
लिप बाम किंवा ग्लॉसने सजलेले हायड्रेटेड व मऊ ओठ हा लूक अधिक रिलेटेबल बनवतात. निखळ नैसर्गिकता हाच त्याचा गाभा. -
हा ट्रेंड का आवडतोय?
कारण- हा ट्रेंड सांगतो सौंदर्य म्हणजे वास्तवातलं स्वतःला स्वीकारणं. जड मेकअपशिवायही आपण आकर्षक दिसू शकतो, हेच याचं गुपित!
‘टायर्ड गर्ल मेकअप’ एवढा लोकप्रिय का? वाचा, काय आहे सहज सुंदरतेला ग्लॅममध्ये बदलण्याचं गुपित
सोशल मीडियावर ‘टायर्ड गर्ल मेकअप’ची जोरदार चर्चा; अपूर्णता, साधेपणा व नैसर्गिक ग्लॅम यांचा मिलाफ महिलांना भुरळ घालतोय.
Web Title: Tired girl makeup trend takes over social media with natural beauty twist svk 05