-
भारत एआय अॅप्ससाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. ही अॅप्स लोकप्रिय होत आहेत त्यामागची कारणे म्हणजे ते दैनंदिन कामं जलद आणि सोपी करत आहेत. (Photo: AI)
-
आज आपण भारतात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अॅप्सबद्दल माहिती घेऊ. (Photo: AI)
-
चॅटजीपीटी
ओपनएआयचे चॅटजीपीटी हे भारतात सर्वाधिक वापरले जाणारे एआय अॅप बनले आहे. प्रश्नांची उत्तरं, निबंध, कोडिंग करणं आणि कंटेंट तयार करण्यासाठी हे अॅप लोकप्रिय आहे. त्यातून मिळणारा मजकूर आणि उत्तम दर्जाची छायाचित्रांमुळे चॅटजीपीटी लोकांच्या पसंतीस उतरले आहे. (Photo: AI) -
गुगल जेमिनी
गुगल जेमिनी चॅटजीपीटीला जोरदार टक्कर देताना दिसत आहे. अँड्रॉइड युजर्समध्ये हे अॅप खूप लोकप्रिय झालं आहे. जेमिनी अनेक भारतीय भाषांमध्ये वापरता येतं आणि व्हॉइस असिस्टन्स, मल्टिमोडल उत्तरं आणि फोटोंचं विश्लेषण यासारखी वैशिष्ट्यं प्रदान करतं. (Photo: AI) -
Perplexity AI
गुगल सर्चला पर्याय म्हणून भारतात Perplexity एआय वेगाने लोकप्रिय होत आहे. हे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर त्याच्या स्त्रोतासह देतं, हे तंत्रज्ञान विद्यार्थी आणि संशोधकांना खूप आवडलं आहे. एअरटेलसोबतच्या भागीदारीनंतर त्याची लोकप्रियता वाढली आहे कारण एक वर्षासाठी त्याचे प्रो व्हर्जन ऑफर देत आहेत. (Photo: AI) -
यूट्यूबर ध्रुव राठीने एआय फिएस्टा नावाचा एक प्लॅटफॉर्म लॉन्च केलंय. ज्यामध्ये ChatGPT-5, Gemini 2.5 Pro, Claude Sonnet आणि Grok सारखे अनेक चॅटबॉट्स एकाच वेळी उपलब्ध असतील. हे सध्या अँड्रॉइडसाठी उपलब्ध आहे आणि लवकरच आयओएस आणि वेबवर उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. (Photo: AI)
-
हेल्दीफाईमी हे भारतातील सर्वाधिक पसंतीचे हेल्थ आणि फिटनेस अ ॅप आहे. यामध्ये एआय कोच रिया डाएट प्लॅन, कॅलरी ट्रॅकिंग आणि वर्कआउट टिप्स देते. हे अॅप फिटनेसच्या पलीकडे मानसिक आरोग्यावरही टिप्स देत आहे, ज्यामुळे ते भारताच्या वाढत्या आरोग्य क्षेत्रात एक विश्वासार्ह एआय अॅप बनले आहे. (Photo: AI) हेही पाहा- Asia Cup: माही भाई नाही, आशिया कपमध्ये कर्णधार म्हणून ‘हा’ दिग्गज नंबर १; सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप ५ कर्णधार
भारतात कोणतं AI App सर्वात लोकप्रिय आहे? ChatGPT कितव्या स्थानी?
आज आपण भारतात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अॅप्सबद्दल माहिती घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया या यादीत कोणते अॅप पहिल्या क्रमांकावर आहे.
Web Title: Popular ai apps in india chatgpt gemini ranks know in marathi spl