Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. story of ekdanta ganesha mahabharata writing broken tooth legend svk

Ganeshotsav 2025 : महाभारताच्या लेखनाशी जोडलेली एकदंताची ‘ही’ कथा तुम्हाला माहीत आहे का?

Lord Ganesha Tusks Story: गणेश चतुर्थीला होते बुद्धी आणि समृद्धीच्या अधिपतीचे आगमन, पौराणिक कथेतून प्रकट झाला एकदंताचा गौरवशाली इतिहास.

August 28, 2025 12:29 IST
Follow Us
  • Lord Ganesha Tusks Story
    1/9

    गणेश चतुर्थीचा पवित्र सोहळा बुद्धी, ज्ञान व समृद्धीचा अधिष्ठाता असलेल्या गणेशाचे आगमन गणेश चतुर्थीला होते. त्या दिवशी देशभर भक्तिभावाने गणेश पूजा केली जाते.

  • 2/9

    ज्ञानदेव गणपती गणेशाला फक्त विघ्नहर्ताच नव्हे, तर बुद्धीचा देव आणि पहिला ‘लघुलेखक‘ (स्टेनोग्राफर’) म्हणूनही मान दिला जातो. त्यांच्या लेखणीने अनेक पौराणिक आख्यायिका अमर झाल्या. (Photo: Pexels)

  • 3/9

    महाभारताची कथा महर्षी वेदव्यास महाभारत रचत होते आणि गणपतीने आपल्या अविरत लेखणीने ते ग्रंथरूपात उतरवले. म्हणूनच गणरायाला ज्ञान आणि लेखनकलेचा अधिपती, असे म्हटले जाते. (Photo: Meta AI)

  • 4/9

    महाभारतासारख्या विशाल आणि गुंतागुंतीच्या महाकाव्याचे श्रुतलेखन करण्यासाठी कुणी मिळत नव्हते. म्हणून महर्षी वेदव्यास ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेवांनी त्यांना गणेशाचे नाव सुचवले. कारण- गणेशाची लेखणी वेगवान, अक्षर सुंदर आणि बुद्धी प्रखर होती.

  • 5/9

    मग महर्षी वेदव्यास महाभारत रचना करण्याच्या दृष्टीने गणेशाकडे गेले. गणेशाने प्रस्ताव मान्य केला; पण त्यांना एक अट घातली की, व्यासांनी कथा एकदाही न थांबता सांगावी; अन्यथा ते लेखन थांबवतील.

  • 6/9

    गणेशाची अट मान्य करताना व्यासांनीही एक अट ठेवली. ते म्हणाले की, मी न थांबता बोलेन; पण तुम्ही प्रत्येक ओळ नीट समजूनच लिहायची. गणपतीनेही ती अट स्वीकारली आणि महाभारताचे लेखन सुरू झाले. (Photo: Pexels)

  • 7/9

    महाभारताचे लेखन करीत असताना गणपतीची लेखणी तुटली; मात्र अट मोडता कामा नये म्हणून गजाननाने स्वतःचा एक दात तोडून, त्याचीच लेखणी बनवली. तेव्हापासूनच गणेशाला एकदंत म्हणून ओळखले जाते. (Photo: Meta AI)

  • 8/9

    महाभारताचे लेखन अनेक महिने अखंड चालले. व्यास बोलत राहिले आणि गणेश न थांबता लिहीत राहिले. म्हणूनच गणरायांना जगातील पहिले ‘लघुलेखक‘ (स्टेनोग्राफर’), असे म्हटले जाते. (Photo: Pexels)

  • 9/9

    दुसऱ्या आख्यायिकेनुसार, परशुरामांना कैलासावर प्रवेश रोखल्यामुळे गणेश आणि परशुराम यांच्यात युद्ध झाले. परशुरामांच्या फरशीच्या घावाने गणपतीचा दात मोडला आणि त्याला एकदंत हे नाव लाभले. (Photo: Pexels)

TOPICS
गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025ट्रेंडिंगTrending

Web Title: Story of ekdanta ganesha mahabharata writing broken tooth legend svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.