-
आता तुम्ही रस्त्यावर उतरलात तर तुम्हाला प्रत्येक पावलावर पेट्रोल पंप दिसतात. गाव असो वा शहर, तुम्हाला सर्वत्र थोड्या- थोड्या अंतरावर पेट्रोल पंप आढळून येतात. पण भारतात पहिला पेट्रोल पंप कुठे सुरू केला गेला आणि तेव्हा त्याची किंमत किती होती? (Photo: Indian Express)
-
भारतातील पहिला पेट्रोल पंप १९२८ मध्ये मुंबईत सुरू करण्यात आला होता. हा पेट्रोल पंप बर्मा शेल (भारत पेट्रोलियम) ने सुरू केला होता. (Photo: Indian Express)
-
भारतातील पहिला पेट्रोल पंप मुंबईतील ह्यूजेस रोड (आता अँनी बेझंट रोड, वरळी) वर उभारण्यात आला आणि त्याचे नाव बर्मा शेल स्टेशन असे ठेवण्यात आले. (Photo: Meta AI)
-
पूर्वी, पेट्रोल पंपावर फक्त दोन हाताने चालवले जाणारे डिस्पेंसर होते आणि दररोजचा वापर फक्त काहीशे लिटर होता. प्रत्यक्षात, त्यावेळी वाहनांची संख्या मर्यादित होती. (Photo: Meta AI)
-
पूर्वीच्या पेट्रोल पंपांची साठवणूक करणाऱ्या टाकीची क्षमता २००-३०० गॅलन (९००-१२०० लिटर) एवढीच होती. त्यानंतर बर्मा, इराण आणि पश्चिम आशियातून जहाजांद्वारे पेट्रोल मुंबई बंदरात आणले जात असे. कारण, त्यावेळी भारतात रिफायनरी नव्हती. (Photo: Meta AI)
-
बंदरावर पेट्रोल उतरवल्यानंतर, ड्रम ट्रक आणि बैलगाड्यांद्वारे पंपांवर नेले जात असे. त्यानंतर, ड्रमवर हातपंप बसवून वाहनांमध्ये तेल भरले जाते. (Photo: Meta AI)
-
जेव्हा भारतात पेट्रोल पंप उघडले जात होते तेव्हा पेट्रोलचे दर १ आणे (सुमारे ६ पैसे) ते २ आणे (१२ पैसे) प्रति लिटर होते. त्यावेळीही हे दर बरेच महाग मानले जात असतं. कारण दरडोई उत्पन्न दररोज एक रुपयांपेक्षा कमी असायचे. (Photo: Meta AI)
-
त्या काळात ब्रिटीश अधिकारी, सरकारी अधिकारी, ब्रिटीश आयसीएस अधिकारी, लष्करातील मेजर आणि पोलिस अधिकारी मोटार कारने प्रवास करायचे. मुंबईत मोटार कार घेणारे लोक श्रीमंत पारसी आणि गुजराती व्यापारी कुटुंबातील लोकच होते. त्या काळात फोर्ड, डॉज आणि फियाट या कार्स रस्त्यांवर चालताना दिसत होत्या. (Photo: Meta AI) हेही पाहा- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटलांचं शिक्षण किती?
भारतात पहिला पेट्रोल पंप कोणत्या शहरात सुरू झाला? तेंव्हा किती होते पेट्रोलचे दर?
India First Petrol Pump: : भारतात जेव्हा पहिला पेट्रोल पंप सुरू झाला तेव्हा लोक हातपंपाने पेट्रोल भरत असत. त्या काळात पेट्रोलची किंमत खूपच कमी होती.
Web Title: India first petrol pump and what was the price then spl