-
शुभ शकुनाची परंपरा भारतीय परंपरांमध्ये शुभ शकुन हा फक्त पैसे देण्याची प्रथेमध्ये नाही, तर शुभेच्छा आणि आशीर्वादाचे ते प्रतीक मानले जाते. लग्न, वाढदिवस, सण किंवा अन्य शुभ प्रसंगी तो दिला जातो. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश )
-
शुभ शकुनाची रक्कम विषम का असते? शभ शकुनाची रक्कम सहसा विषम दिली जाते, जसे ₹५१, ₹१०१, ₹५०१. विषम संख्या ‘अखंड’ मानली जाते, म्हणजे ती विभाज्य नाही आणि त्यामुळे आशीर्वाद व नाते कधीच तुटणार नाही याचा संदेश मिळतो. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश )
-
₹१ चे महत्त्व शुभ शकुनाच्या रकमेतील ₹१ केवळ पैसे नाही, तर शुभेच्छा, प्रगती व समृद्धीचे ते प्रतीक आहे. या छोट्या रकमेमुळे रक्कम पूर्ण होऊन नव्या सुरुवातीची भावना व्यक्त होते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश )
-
नवीन सुरुवात दर्शवते भारतीय संस्कृतीत शून्य (०) समाप्तीचे प्रतीक आहे; तर १ नवीन सुरुवात. १०० ऐवजी दिल्यास ही रक्कम नवीन सुरुवात व सतत वाढ दर्शवते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश )
-
अखंड नातेसंबंध विषम रक्कम वापरण्यामुळे नाती व आशीर्वाद अखंड राहतात. याचा अर्थ असा की, दिलेल्या आशीर्वादामुळे नातेसंबंध तुटत नाहीत आणि जीवनभर जिव्हाळा टिकतो. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश )
-
समृद्धीचs चिन्ह शुभ शकुनात ₹१ हे धनदेवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे जीवनात संपत्ती, प्रगती आणि सुख-समृद्धी वाढते, अशी श्रद्धा आहे. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश )
-
आध्यात्मिक संदेश शुभ शकुन केवळ पैसा देण्यापुरता मर्यादित नाही. त्यात मोठ्यांचे आशीर्वाद, नाती मजबूत करणे व जीवनात सतत प्रगती या अर्थांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश )
-
शुभेच्छांचा संदेश शुभ शकुनातील ₹१ हा फक्त सिक्का नाही, तर “तुमचे जीवन सदैव पुढे जावे, नातेसंबंध मजबूत राहावेत आणि घरात लक्ष्मीचा वास राहो” हा संदेश त्यातून दिला जातो. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश )
-
शुभ शकुन देताना लक्षात ठेवा पुढच्या वेळी शुभ शकुन देताना किंवा घेताना लक्षात ठेवा की, ₹ १ केवळ आर्थिक मूल्य नाही, तर नवीन सुरुवात, अखंड नाती व वाढती समृद्धी यांचे ते प्रतीक आहे. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश )
भारतीय परंपरांमध्ये ₹१ का असतो खास? जाणून घ्या त्यामागचे गहन अर्थ
भारतीय परंपरांमागे काही ना काही गहन अर्थ आणि श्रद्धा असते. अशाच परंपरांपैकी एक म्हणजे शगुनाच्या लिफाफ्यात नेहमी एक अतिरिक्त ₹१ जोडण्याची प्रथा.
Web Title: Shagun meaning why 1 rupee added indian tradition blessings prosperity family svk 05