-
सध्या जगामध्य रात्रीच्या बाजारपेठा एक नवी संस्कृती तयार करत आहेत. ज्यामध्ये आकर्षक स्ट्रीट फूड, स्थानिक हस्तकला, संगीत आणि उत्साह यांचा समावेश असतो. जर तुम्हाला नाईट आऊट करायला, शहरांमध्ये फिरायला आवडत असेल, तर जगभरातील हे ६ रात्रीचे बाजार तुमच्या विशलिस्टमध्ये समाविष्ट करा…
-
अर्पोरा नाईट मार्केट, गोवा, भारत: दर शनिवारी भरणारे हे बोहेमियन शैलीचे नाईट मार्केट आहे. इथे भारतीय संगीत, स्थानिक आणि जागतिक खाद्यपदार्थांचे स्टॉल, हस्तनिर्मित दागिने आणि विविध कपड्यांचा बाजार भरतो.
-
चियांग माई नाईट बाजार, थायलंड: आकर्षक हस्तकला आणि उत्तर थाई पाककृतींसाठी ओळखला जाणारा हा बाजार स्थानिक कला, कपडे आणि खाओ सोई (नारळ करी नूडल डिश) चाखण्यासाठी प्रसिद्ध आहे.
-
दुबई नाईट सौक, यूएई: या रात्रीच्या बाजारात लाईव्ह संगीत, स्ट्रीट परफॉर्मर्स आणि परफ्यूम, दागिने आणि मध्य पूर्व स्ट्रीट फूड विकणारे स्टॉल्स उपलब्ध असतात.
-
माराकेश नाईट मार्केट, मोरोक्को: हा बाजार जेमा एल-फना स्क्वेअर येथे भरतो, इथे गोष्टी सांगणारे, सर्पमित्र आणि ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाखाली टॅगिन, कुसकुस आणि ताज्या संत्र्याचा रस देणारे खाद्य विक्रेते असतात. हा बाजार शहराच्या रात्रीच्या सौंदर्यात भर घालतो.
-
शिलिन नाईट मार्केट, तैपेई, तैवान: आशियातील सर्वात प्रसिद्ध नाईट मार्केटपैकी एक, शिलिन हे ठिकाण अन्नप्रेमींसाठी स्वर्ग आहे. इथल्या स्टॉल्सवर टोफू, ऑयस्टर ऑम्लेट आणि बबल टी हे पदार्थ मिळतात. ते अजिबात चुकवू नका.
-
टेंपल स्ट्रीट नाईट मार्केट, हाँगकाँग: इथे भविष्य सांगणारे असतात. खुल्या हवेत खाद्यपदार्थांचे स्टॉल लागलेले असतात. खरेदीविक्रीसाठी प्रसिद्ध असलेले टेंपल स्ट्रीट खऱ्या अर्थाने सांस्कृतिक अनुभव देतो.
हेही पाहा- कामामुळे व्यायाम थांबलाय? पुन्हा नवी सुरुवात करण्यास प्रोत्साहन देणारे ६ सोपे उपाय
Photos: यूएई, तैवान, थायलंड ते भारत; ‘या’ ७ देशांमध्ये रात्री भरतो बाजार, काय मिळतं या नाईट मार्केटमध्ये?
हे काही रात्रीचे बाजार आहेत ज्यांबद्दल तुम्हाला माहिती नसेल आणि तुम्ही नक्कीच भेट द्यावी.
Web Title: Night markets around the world that you must visit spl