-
ज्योतिषशास्त्रात शनीची साडेसाती हा शब्द ऐकताच अनेकांच्या अंगावर काटा येतो. कारण- शनीची ही चाल जीवनात सुख-दुःख, परीक्षा, कष्ट व प्रगती यांचा संगम घडवून आणते.
-
आता शनी महाराज मीन राशीत गोचर करीत आहेत. त्यामुळे कुंभ, मीन व मेष राशी या तीन राशींवर सध्या साडेसातीचा प्रभाव आहे. पण, ३ जून २०२७ पासून शनी जेव्हा मेष राशीत प्रवेश करतील, तेव्हा एका राशीची साडेसाती संपणार आणि एका नव्या राशीवर शनीची साडेसाती सुरू होणार आहे.
-
साडेसाती म्हणजे शनी ग्रह जेव्हा जन्मकुंडलीतील चंद्राच्या राशीच्या आधीची, त्याच राशीची आणि नंतरची अशा तीन राशींमधून प्रवास करतो. हा काळ साधारण साडेसात वर्षांचा असतो.
-
प्रत्येकासाठी शनीची साडेसाती वाईटच असेल, असं नाही. ज्यांच्या कुंडलीत शनी शुभ स्थानावर असेल, त्यांना शनी मोठं यश, पैसा, पद व कष्टाचं फळ देतो. पण, ज्यांच्या कुंडलीत शनी नीच स्थानात असेल, त्यांना संघर्ष, अडचणी, आरोग्य समस्या आणि आर्थिक अडथळे येऊ शकतात.
-
सध्या शनी मीन राशीत असल्यामुळे कुंभ राशी – शेवटचा टप्पा. मीन राशी – मधला टप्पा. मेष राशी – पहिला टप्पा. या राशींमध्ये शनीची साडेसाती चालू आहे.
-
शनी महाराज ३ जून २०२७ रोजी जेव्हा मेष राशीत प्रवेश करतील, तेव्हा वृषभ राशीमध्ये साडेसातीची सुरुवात होईल. त्याच वेळी कुंभ राशीवाल्यांना साडेसातीपासून पूर्ण मुक्ती मिळेल आणि मीन राशीवाल्यांच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होईल. मेष राशीवाल्यांसाठी दुसरा टप्पा सुरू होईल.
-
साडेसाती ही शनीची एक अशी वेळ आहे, जी काहींना आयुष्यातील मोठं यश देऊन जाते; तर काहींना त्यावेळी जबरदस्त परीक्षा द्यावी लागते. ज्यांच्या कुंडलीत शनीची स्थिती शुभ आहे, त्यांच्यासाठी हा काळ सुवर्णसंधी मिळवून देणारा ठरतो.
-
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)
-
(फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
शनीच्या साडेसातीने बदलणार नशीबाचा खेळ! शनी महाराज घेणार ‘या’ राशीच्या लोकांची परीक्षा? पाहा तुमची रास आहे का?
Saturn Sade Sati 2027: शनी जेव्हा मेष राशीत प्रवेश करतील, तेव्हा एका राशीची साडेसाती संपणार आणि एका नव्या राशीवर शनीची साडेसाती सुरू होणार आहे.
Web Title: Horoscope big saturn shift in 2027 check if your zodiac sign faces sade sati pdb