-
कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि त्याचा भाऊ सचिन घायवळ सध्या चर्चेत आहे. सचिन घायवळला शस्त्र परवाना दिल्याबद्दल राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर विरोधकांनी टीका केली आहे. तर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असलेला गुंड निलेश घायवळ लंडनला पसार झाल्यामुळे पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
-
फेब्रुवारी २०२४ मध्ये
निलेश घायवळचा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेबरोबरचा एक फोटो समोर आला होता. या फोटोवरून वाद निर्माण झाल्यानंतर घायवळची चर्चा सुरू झाली होती. -
पुण्याच्या कोथरुडमधील गुंड गजानन मारणे आणि निलेश घायवळ हे एकेकाळी एकमेकांचे मित्र होते. मात्र दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाल्यानंतर त्यांच्या वेगवेगळ्या टोळ्या पुणे जिल्ह्यात कार्यरत होत्या.
-
गँगस्टर म्हटला की, तो कमी शिकलेला किंवा परिस्थितीने नाडलेला असतो, असे चित्र उभे राहते. मात्र निलेश घायवळने एम.कॉम पर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. उच्चशिक्षण घेतलेले असतानाही घायवळ गुन्हेगारी जगताकडे कसा वळला? हे जाणून घेऊ.
-
मुळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड तालुक्यातील राहणारा निलेश घायवळ शिक्षणासाठी पुण्यात आला. इथे त्याची ओळख गुंड गजा मारणेबरोबर झाली. दोघांनी मिळून बांधकाम व्यावसायिकाचा खून केला. या गुन्ह्यात दोघांना सात वर्षांची शिक्षा झाली. बाहेर आल्यानंतर त्यांची गुन्हेगारीची वाटचाल सुरू झाली.
-
गजा मारणे आणि निलेश घायवळ यांच्यात दोन गणपती मंडळाच्या कारणावरून वाद झाला आणि त्यानंतर त्यांच्यातील वितुष्ट वाढत गेले. वीस वर्षांपासून या दोघांमध्ये शत्रुत्व आहे. या काळात त्यांनी एकमेकांवर अनेकदा लक्ष्य केले.
-
निलेश घायवळच्या टोळीने गुंड सचिन कुडलेची पुण्यात भररस्त्यात दिवसाढवळ्या पाठलाग करून सिनेस्टाईलने हत्या केली होती. या हत्येची पुण्याच्या गुन्हेगारी जगतात बरीच चर्चा झाली. या हत्येनंतर घायवळसह २६ जणांवर मकोका दाखल करण्यात आला होता.
-
निलेश घायवळ याच्यावर मकोका, खून, जीवे मारण्याचा प्रयत्न, खंडणी, दरोडा, गंभीर दुखापत करणे असे गंभीर स्वरुपाचे अनेक गुन्हे दाखल होते. फक्त पुण्यातच नाही तर शेजारच्या अहिल्यानगर, बीड, धाराशिव या जिल्ह्यांमध्येही त्याच्यावर खंडणी, अपहरण आणि इतर गुन्हे दाखल झालेले आहेत.
-
निलेश घायवळ हा फक्त गुन्हेगारी जगतापुरता मर्यादीत नव्हता तर त्याने राजकीय क्षेत्रातही स्वतःचा दबदबा निर्माण केला होता. एकनाथ शिंदे, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या बरोबरचे निलेश घायवळचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामुळे लंडनला पसार झालेल्या निलेश घायवळवर कुणाचा वरदहस्त होता? अशी चर्चा सुरू आहे.
लंडनला पसार झालेला गँगस्टर निलेश घायवळ कोण? उच्चशिक्षित असलेला घायवळ गुन्हेगारी विश्वात कसा आला?
Who is Nilesh Ghaiwal: कुख्यात गुंड निलेश घायवळ लंडनला पसार झाल्यानंतर त्याच्याबद्दल अनेक बातम्या समोर आल्या आहेत. त्याचे अनेक राजकीय नेत्यांबरोबरचे फोटोही चर्चेत येत आहेत.
Web Title: Who is pune gangster nilesh ghaiwal abscond to london know nilesh ghaywal history education information kvg