• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. brajbhumi premanand maharaj rajendra das maharaj emotional meeting devotion bhajan spiritual experience svk

कोण आहेत राजेंद्र दास महाराज? त्यांना पाहताच प्रेमानंद महाराज का झाले भावूक?

प्रेमानंद महाराज आणि राजेंद्र दास महाराजांच्या मिलनाने भक्त भावूक झाले,

October 18, 2025 13:25 IST
Follow Us
  • premanand ji maharaj
    1/11

    ब्रजभूमीत बुधवार, १५ ऑक्टोबरचा दिवस भक्ती, भावना आणि अध्यात्माने भरलेला ठरला. मथुरा-वृंदावनच्या राधा केली कुंज आश्रमात दोन महान संतांचे पवित्र मिलन झाले. (Photo Source: Bhajan Marg/YouTube)

  • 2/11

    दोन संतांचा संगम : मलूक पीठाधीश्वर श्री राजेंद्र दास जी महाराज आणि संत प्रेमानंद जी महाराज यांची भेट घेण्यासाठी आश्रमात मोठ्या संख्येने भक्त जमले होते. त्यामुळे तेथे भक्तिभाव आणि समाधानमय वातावरण पसरले होते. (Photo Source: Bhajan Marg/YouTube)

  • 3/11

    भावनिक क्षण : प्रेमानंद महाराजांनी राजेंद्र दास महाराजांचे दर्शन घेताच त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. त्यांनी चौकटीवर दंडवत घालून, त्यांच्या चरणांचे पूजन केले. तो क्षण उपस्थित सर्वांच्या मनात कोरला गेला. (Photo Source: Bhajan Marg/YouTube)

  • 4/11

    भक्तांचेही डोळे पाणावले
    या प्रसंगी उपस्थित असलेल्या भक्तांचेही डोळे पाणावले. जणू अवघा आश्रम काही क्षण संपूर्ण शांतता आणि भक्तिभावाने भारून गेला होता. (Photo Source: Bhajan Marg/YouTube)

  • 5/11

    आरोग्याची कामना:
    राजेंद्र दास महाराजांनी प्रेमानंद महाराजांच्या आरोग्य लाभासाठी प्रार्थना केली आणि ब्रजभूमीतील संतांच्या भक्ती-साधनेविषयी सुंदर विचार मांडले. (Photo Source: Bhajan Marg/YouTube)

  • 6/11

    धार्मिक संवाद :
    दोन्ही संतांनी श्रीराम व श्रीकृष्ण यांच्या अवतारकथा आणि त्यांच्या भक्ती मूल्यांवर चर्चा केली. या संवादाने सर्व भक्त मंत्रमुग्ध झाले. (Photo Source: Bhajan Marg/YouTube)

  • 7/11

    प्रेमानंद महाराजांची प्रकृती सुधारतेय :
    काही काळापासून अस्वस्थ असलेले प्रेमानंद महाराज आता हळूहळू बरे होत आहेत. देशभरातील संत त्यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी आश्रमात येत आहेत. (Photo Source: Bhajan Marg/YouTube)

  • 8/11

    बागेश्वर धाम महाराजांची भेट: अलीकडेच बागेश्वर धाम महाराज धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनीही प्रेमानंद महाराजांची भेट घेतली होती. त्यामुळे भक्तांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. (Photo Source: Bhajan Marg/YouTube)

  • 9/11

    व्हिडीओ झाला व्हायरल:
    या भावनिक मिलनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. दोन्ही संतांचे परस्परांवरील प्रेम पाहून भक्त भावूक झाले. (Photo Source: Bhajan Marg/YouTube)

  • 10/11

    राजेंद्र दास महाराजांची ओळख:
    श्री राजेंद्र दासजी महाराज हे वृंदावनच्या मलूक पीठाचे प्रमुख असून, ते वेदांत आणि श्रीमद भागवत पुराणाचे गाढ ज्ञाता आहेत. त्यांच्या प्रवचनांतून भक्तांना जीवनातील दुःखातून मुक्तीचा मार्ग सापडतो. (Photo Source: Bhajan Marg/YouTube)

  • 11/11

    भजनाने भारले वातावरण:
    भेटीच्या शेवटी प्रेमानंद महाराजांनी भजन ऐकण्याची विनंती केली. राजेंद्र दास महाराजांनी “प्यारी तेरे नैना मदन सरवारी…” हे भजन गायले आणि संपूर्ण आश्रम भक्तिभावाने भारून गेला. (Photo Source: Bhajan Marg/YouTube)

TOPICS
ट्रेंडिंगTrending

Web Title: Brajbhumi premanand maharaj rajendra das maharaj emotional meeting devotion bhajan spiritual experience svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.