-

सारा तेंडुलकरने नुकतीच तिच्या सोशल मीडियावर काही अप्रतिम फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती डी बीअर्स (De Beers) या प्रसिद्ध डायमंड ब्रँडच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसते.
-
“Art is born deep within the Earth where carbon transforms into creation…“ (“कला पृथ्वीच्या अगदी खोलवर जन्म घेते, जिथे कार्बनचे रूपांतर एका निर्मितीमध्ये होते…”) या वाक्याद्वारे सारा तेंडुलकरने निसर्गातील हिऱ्यांचा अद्भुत प्रवास सुंदर शब्दांत मांडला आहे.
-
तिने पुढे लिहिले आहे, “A natural diamond is the ultimate masterpiece, crafted by nature itself (“नैसर्गिक हिरा ही निसर्गाने स्वतःहून तयार केलेली अंतिम कलाकृती) तिचेहे वाक्य तिची नैसर्गिक सौंदर्याबद्दलची तिची जाण आणि संवेदनशीलता दर्शवते.
-
कार्यक्रमादरम्यान सारा ग्रे सूटमध्ये एलिगंट आणि पॉवरफुल लूकमध्ये झळकली. तिच्या या मिनिमल आणि क्लासी स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधले.
-
दुसऱ्या फोटोत ती काळ्या गाऊनमध्ये दिसते, ज्यातून तिचा सोज्वळ आणि ग्रेसफुल अंदाज स्पष्ट दिसतो. तिच्या लूकमधील साधेपणा आणि आत्मविश्वास दोन्ही आकर्षक वाटतात.
-
सारा तेंडुलकरने आपल्या कॅप्शनमध्ये De Beers Group चे आभार मानले आहेत आणि या प्रवासाला “an incredible journey discovering the beauty and brilliance of real diamonds” (“खऱ्या हिऱ्यांचे सौंदर्य आणि तेज शोधण्याचा एक अविश्वसनीय प्रवास”) असे संबोधले आहे.
-
हिऱ्यांचा निसर्गाशी असलेला संबंध आणि त्यातील कलात्मकता सारा तेंडुलकरने तिच्या शब्दांत आणि भावनांमध्ये सुंदरपणे व्यक्त केली आहे.
-
सोशल मीडियावर सारा तेंडुलकरच्या या पोस्टने पुन्हा एकदा तिच्या क्लासिक फॅशन सेन्स आणि एलिगंट व्यक्तिमत्त्वाची झलक दाखवली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सारा तेंडुलकर/इन्स्टाग्राम)
Photos : सारा तेंडुलकरचा डायमंडसारखा एलिगंट लूक; डी बीअर्सच्या कार्यक्रमात झळकली ग्रेसफुल अंदाजात
‘Art is born deep within the Earth…’ या कॅप्शनसह सारा तेंडुलकरने नैसर्गिक हिऱ्यांच्या सौंदर्याबद्दल व्यक्त केल्या भावना
Web Title: Sachin tendulkar daughter sara tendulkar stunning diamond like elegant look at de beers grand event svk 05