-

अंबानी कुटुंबातील महिला नीता अंबानी, ईशा अंबानी, श्लोका मेहता आणि राधिका मर्चंट नेहमीच आपल्या निर्दोष आणि चमकदार त्वचेसाठी ओळखल्या जातात. त्यांचा सौंदर्याचा हा तेजस्वी लूक रोजच्या स्किनकेअर सवयींचा परिणाम आहे.
-
या सर्व महिला सकाळची सुरुवात डिटॉक्स वॉटरने करतात. कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्यायल्याने शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात आणि त्वचा आतून तजेलदार राहते.
-
नीता आणि त्यांच्या सुना सीटीएम फॉर्म्युला – क्लिंजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग – नियमितपणे पाळतात. हे त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक टप्पे मानले जातात.
-
बाहेर जाण्यापूर्वी अंबानी कुटुंबातील स्त्रिया कधीच सनस्क्रीन लावायला विसरत नाहीत, त्यामुळे त्यांची त्वचा सूर्यकिरणांपासून सुरक्षित राहते आणि चेहऱ्यावर काळेपणा येत नाही.
-
रात्री झोपण्यापूर्वी त्या आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार फेस सीरम लावतात. नाइट सीरममुळे त्वचा मऊ, तजेलदार आणि पोषणयुक्त राहते.
-
अंबानी महिलांचा आहारही त्यांच्या सौंदर्याचा मोठा भाग आहे. या सगळ्या महिला प्लांट-बेस्ड डायट फॉलो करतात, ज्यात ताज्या भाज्या, सॅलेड आणि ज्यूसचा समावेश असतो.
-
मांसाहार टाळून आणि भरपूर पाणी पिऊन त्या आपली त्वचा नैसर्गिकरीत्या हायड्रेट ठेवतात, त्यामुळे चेहऱ्यावर सदैव नैसर्गिक ग्लो दिसून येतो.
-
अंबानी परिवारातील महिलांची ही स्किनकेअर रूटीन सवय केवळ महागड्या उत्पादनांवर नव्हे, तर नियमित काळजी, योग्य आहार आणि शिस्तबद्ध जीवनशैलीवर आधारित आहे. कोणालाही त्यांच्यासारखी ग्लोइंग स्किन हवी असल्यास हे रूटीन सहज अवलंबता येते.
-
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती मीडिया रिपोर्ट्सवर आधारित आहे. कोणतीही सवय किंवा आहार पद्धत सुरू करण्यापूर्वी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या. (सर्व फोटो सौजन्य : मनीष मल्होत्रा/इन्स्टाग्राम)
महागडे ट्रीटमेंट्स नाही, नीता अंबानी ‘या’ रोजच्या सवयींनी टिकवतात ग्लो; सुनांच्या सौंदर्याचं खऱं रहस्य
नीता, ईशा, श्लोका आणि राधिका अंबानी यांचा स्किनकेअर रूटीन बनला अनेक महिलांसाठी प्रेरणादायी; नैसर्गिक पद्धतीने ठेवतात त्वचेचा ग्लो कायम
Web Title: Ambani family ladies skincare routine natural beauty secrets skin tips rich people lifestyle svk 05