-

पंजाबी गायिका सुनंदा शर्मा सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे.
-
पंजाबी गायिका म्हणून प्रसिद्ध असलेली सुनंदा तिच्या गाण्यांमुळे अनेकदा चर्चेत असते. मात्र सध्या तिने एका लाईव्ह कार्यक्रमादरम्यान चाहत्याला दिलेल्या अनपेक्षित प्रतिसादाबद्दल लोक तिची चर्चा करत आहेत.
-
गायकांचा लाईव्ह कार्यक्रम असेल तर चाहते अशा कार्यक्रमांना गर्दी करतात. साहजिकच दर्दी चाहत्यांसाठी गायक काही ना काही विशेष आठवण देण्याचा प्रयत्न करत असतात.
-
सुनंदा शर्माच्या व्हायरल व्हिडीओमध्ये तिचा चाहता स्टेजजवळ तिला साद घालताना दिसत आहे.
-
अतिशय उत्साहाने भरलेल्या या चाहत्याला सुनंदा शर्मा स्टेजवर बोलवते.
-
चाहता स्टेजवर आल्यानंतर सुनंदा त्याला मिठी मारते. त्याच्याशी संवाद साधते आणि त्याला फोटो काढू देते.
-
कोण आहे सुनंदा शर्मा?
आपल्या वेगळ्या अंदाजाने स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या सुनंदाचा जन्म ३० जानेवारी १९९२ रोजी झाला. युट्यूबवर गाणी अपलोड करून तिने या क्षेत्रात पदार्पण केले होते. -
२०१७ रोजी आलेल्या ‘जानी तेरा ना’ या गाण्यामुळे तिला प्रसिद्धी मिळाली. या गाण्याला युट्यूबवर कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत. तिला पंजाबी संगीतासाठी दिला जाणारा पीटीसी पुरस्कारही मिळाला आहे.
-
संगीताबरोबरच सुनंदाने प्रसिद्ध कलाकार दिलजीत दोसांजसह अभिनयही केला आहे. दोघांनी सज्जन सिंह रंगरुटमध्ये काम केले आहे.
पंजाबी गायिका सुनंदा शर्माने लाईव्ह कार्यक्रमात चाहत्याला मारली मिठी; व्हिडीओ व्हायरल, पाहा फोटो
Sunanda Sharma Hug Viral Photo: पंजाबी गायिका सुनंदा शर्माचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ज्यामध्ये तिने तिच्या चाहत्याला मिठी मारल्याचे दिसत आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम /sunanda_ss)
Web Title: Who is sunanda sharma meet punjabi singer going viral for hugging excited fan on stage kvg