छत्रपती संभाजीनगर : निवडणुकीमध्ये भाजपने विरोध केला. निवडून आल्यानंतर सत्तार यांना मंत्री पद देऊ नये अशीही मागणी लाऊन धरण्यात आली. पालकमंत्री पद मिळाल्यानंतर आरखड्यातील निधीचे पनुर्गठन करू असे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटल्यानंतर राजकीय रिंगणात अडकलेल्या आमदार अब्दुल सत्तार यांनी आपला वाढदिवस छत्रपती संभाजीनगर शहरात दणक्यात करण्याची तयारी सुरू केली आहे. या निमित्ताने गर्दी जमवून शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. कसे बसे निवडून आल्यानंतर मंत्री पद न मिळालेले अब्दुल सत्तार त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे प्रसिद्ध असल्याने ते एक जानेवारी रोजी काय बोलतात, याच्या उत्सुकता वाढल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शक्तिप्रदर्शन केल्याने मंत्रिपद मिळत नसते असे अलिकडेच संजय शिरसाट यांनी सत्तार यांचे नाव न घेता त्यांना सुनावले होते. अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद दिले जाऊ नये असे भाजपच्या बहुतांश नेत्यांनी वरिष्ठांना सांगितले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आग्रह केला तरी हे नाव वगळून सारे घडवून आणण्याची विनंती सिल्लोड भाजपच्या प्रतिनिधींनी केली होती. त्यामुळे सत्तार यांची कोंडी झाली होती. यातून बाहेर पडण्यासाठी आता वाढदिवस हे निमित्त असल्याचे सांगण्यात येत आहे. मतदारसंघाबाहेर संभाजीनगर शहरात शक्तिप्रदर्शन करण्याचा सत्तार यांचा मानस असून हा सत्कार सत्तार मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने शहरातील सर्व चौकात सत्तार यांच्या अभिष्टचिंतनाचे फलक लागले आहेत. बसथांबे, चौक, फलक लावण्याच्या जागांवर सगळीकडे सत्तारची छबी असणारे फलक लागले आहेत.

आणखी वाचा-“आपण काठावर पास” निवडणूक निकालावर अमित देशमुख यांची मिश्कील टिप्पणी

मंत्रिपद न मिळाल्याने आपण नाराज नाही, असे जाहीर वक्तव्ये त्यांनी केली आहेत. मात्र, वाढदिवसानिमित्त होणारे हे शक्तिप्रदर्शन जिल्ह्याच्या राजकारणात आपला प्रभाव टिकवून ठेवण्यासाठीच ते आखत असल्याचे सांगण्यात येते. संभाजीनगर जिल्हा बँक, दूध संघावरही सत्तार यांच्या समर्थकांची वर्णी लागलेली होती. आता नव्या रचनेमध्ये त्यावर मात करता येईल असा होरा ठेवून जिल्ह्यातील सर्व नेते सत्तार यांना वगळून निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. संभाजीनगरचे पालकमंत्री कोण होणार यावरही जिल्ह्यातील अन्य संस्थावर कोणाचे वर्चस्व राहील याची गणिते अवलंबून असल्याने सत्तार याचे काय होणार या चर्चेला उत्तर या वाढदिवसाच्या कार्यक्रमातून दिले जाईल असे मानले जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abdul sattars show of strength in sambhajinagar after being denied ministerial post print politics news mrj