राजस्थान काँग्रेसमधील मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी मुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील विस्तव अद्यापही गेला नाही. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशोक गेहलोत यांचं कौतुक केलं होतं. यावरून पायलट यांनी गेहलोत यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्याला अशोक गेहलोत यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुलाम नबी आझाद यांचे कौतुक केलं होते. त्यानंतर आझाद यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. आता मोदींनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे कौतुक केले आहे. या घटनाक्रमाला मी गांभीर्याने घेतो,’ असं सचिन पायलट म्हणाले होते. यावर अशोक गेहलोत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हेही वाचा : लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये फेब्रुवारी महिन्यात पुन्हा ‘खेला होबे’

बरणमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री गेहलोत यांनी पक्षातील अंतर्गत आव्हानांबद्दल विचारले. त्यावर “पक्षात अशी कोणतीही आव्हाने नाही. राजकारणात प्रत्येक माणसाला महत्वकांक्षा असते आणि असली पाहिजे. फरक दृष्टीकोनात आहे. त्यामुळे मी वाईट वाटून का घ्यायचं. फक्त एवढेच सांगायचं की, सर्वांनी एकत्र येत निवडणुका लढल्या आणि जिंकल्या पाहिजे. कारण केवळ राजस्थानच्या नव्हे तर देशाच्या हिताचे आहे,” असा सल्ला गेहलोत यांनी सचिन पायलट यांना दिला.

पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाबद्दल विचारले असता, गेहलोत म्हणाले, “कसले कौतुक? माझ्या कामगिरीबद्दल पंतप्रधान बोलले नाही. पंतप्रधानांना मी तीन मागण्या केल्या होत्या. त्यामध्ये, मानगड धाम हे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे. दुसरे रतलाम ते डुंगरूपर मार्गे बांसावडा रेल्वे प्रकल्प आणि अखरेची राज्य सरकारची चिरंजीवी आरोग्य योजना देशभरात लागू करावी. या मागण्या मान्य केल्या असत्या तर, मी ते कौतुक मानले असते.”

हेही वाचा : हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत प्रचार शिगेला, बाबा रुद्रू यांच्या ‘डेरा’ला विशेष महत्त्व; दर्शन घेण्यासाठी उमेदवारांची रांग

“पंतप्रधानांनी सांगितलं, की देशातील मुख्यमंत्र्यांमध्ये मी सर्वात ज्येष्ठ आहे. मी याला कौतुक समजत नाही. मात्र, पंतप्रधानांना आरसा दाखवत मी म्हणालो, तुम्ही जगात खूप लोकप्रिय आहात. त्यामुळे ज्या देशात तुम्ही जाता तिथे तुमचा आदर केला जातो. कारण, तुम्ही गांधींजींच्या देशाचे पंतप्रधान आहात, जिथे लोकशाहीची मुळे मजबूत आहेत,” असेही अशोक गेहलोत यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok gehlot on pm narendra modi over sachin pilot ashok gehlot vs pilot ssa