केरळमधील कोझिकोडच्या महापौरांनी संघ परिवाराच्या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्या म्हणाल्या की “हिंदू पौराणिक कथांमधील पात्रे आत्मसात केली पाहिजेत आणि माता भगवान कृष्णाच्या भक्त असाव्यात”. एक सीपीएमच्या नेत्याने आरएसएसच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बालगोकुलम या संघ परिवाराच्या मुलांसाठी आयोजित केलेल्या मातांच्या सभेत रविवारी कोझिकोड कॉर्पोरेशनच्या महापौर बीना फिलिप उपास्थित होत्या. त्या म्हणाल्या की “एखाद्याच्या मनात भगवान कृष्णाची प्रतिमा असली पाहिजे. हिंदू पुराणातील पात्रे आत्मसात केली पाहिजेत. जर मातांची लहान कृष्णाप्रती भक्ती असेल तर त्या आपल्या मुलांवर रागावणार नाहीत. प्रत्येक मुलाला छोटा कृष्ण मानला पाहिजे. तेव्हाच मुलांच्या मनात भक्ती आणि प्रेम वाढेल.”बालगोकुलम हे भगवान श्रीकृष्णाच्या प्रेरणेने मुलांमध्ये हिंदू धर्माविषयी शिकण्यास प्रोत्साहन देतात.

रविवारच्या कार्यक्रमात फिलिप यांनी भगवान कृष्णाच्या मूर्तीला हार घातला. यावेळी फिलिप म्हणाल्या की बालसंगोपनात केरळ उत्तर भारतापेक्षा मागे आहे. राज्यातील बालमृत्यूचे प्रमाण कमी असल्याचे मान्य करून त्या म्हणाल्या की “नवजात बालकांचा मृत्यू रोखणे पुरेसे नाही. लहानपणी आपण त्यांच्यापर्यंत काय पोहोचवतो हे महत्त्वाचे आहे. मुलांवर प्रेम कसे करावे हे उत्तर भारतीयांना माहीत आहे.” आरएसएसशी संबंधित कार्यक्रमात सीपीएम नेत्याची उपस्थिती आणि त्यानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यानंतर फिलिप यांना अखेर स्वत: चा बचाव करावा लागला. बचावात्मक पवित्रा घेत त्यांनी सांगितले की अशा कार्यक्रमापासून दूर राहण्याबद्दल त्यांच्या पक्षाकडून कोणतीही सूचना नाही. “मी तिथे उपस्थित असलेल्या प्रत्तेक आईशी बोलत होते. मला कधीच बालगोकुलम ही आरएसएसची संघटना वाटली नाही,” 

सीपीएमचे जिल्हा सचिव पी. मोहनन यांनी जाहीरपणे महापौरांच्या वक्तव्यापासून पक्षाला दूर ठेवले आहे. “त्यांनी बालगोकुलम कार्यक्रमाला हजेरी लावली हे पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात आहे. आम्ही त्यांची भूमिका जाहीरपणे नाकारत आहोत”.  असे त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

सीपीएम आणि काँग्रेसमध्ये त्यांची धर्मनिरपेक्ष ओळख सिद्ध करण्यासाठी राज्यात सतत भांडण सुरू असतात.  विरोधकांनी या घटनेला सीपीएम आणि आरएसएस यांच्यातील संबंध” असल्याचा पुरावा म्हणून संबोधले आहे. केरळ बालसंगोपनात मागे आहे ही महापौरांची भूमिका पक्षाने मान्य केली की नाही हे सीपीएमने स्पष्ट केले पाहिजे,” असे काँग्रेस कोझिकोडचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुमार म्हणाले, अलीकडेच, कोझिकोड येथे आययूएमएल नेते के एन.ए खादर यांनी आरएसएसशी संबंधित कार्यक्रमाला हजेरी लावली होती. सीपीएमने हे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफच्या ‘सॉफ्ट हिंदुत्व लाइन’ चे लक्षण म्हटले आहे. फिलिप या केरळच्या जुन्या कम्युनिस्ट कुटुंबांपैकी एक आहेत. त्यांचे वडील एम.जे फिलिप एर्नाकुलममधील कूथाट्टुकुलम येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते. १९६४ मध्ये सीपीआयमध्ये फूट पडल्यानंतर एम.जे फिलिप सीपीएममध्ये सामील झाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cpm leader bina philips presence at rss event pkd
First published on: 09-08-2022 at 17:12 IST