काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली ‘भारत जोडो’ यात्रा राजस्थानमध्ये सुरु आहे. आज ( १९ डिसेंबर ) ‘भारत जोडो’ यात्रेने अलवर जिल्ह्यात प्रवेश केला आहे. यात्रेत आतापर्यंत अनेक पक्षांचे नेते, अभिनेते, प्रख्यात मंडळींनी उपस्थिती लावली आहे. त्यातच आता अभिनेते कमल हसन हे सुद्धा राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल गांधी यांनी पत्र लिहून कमल हसन यांनी यात्रेत सहभागी होण्याचे आमंत्रण दिलं होतं. त्यानुसार कमल हसन यांना दिल्लीत यात्रा पोहचल्यावर सहभागी होण्यास सांगितलं आहे. त्यानुसार कमल हसन २४ डिसेंबरला यात्रेत सहभागी होणार आहे. यानंतर कळेल की पुढील वाटचाल कशी करायची आहे. आणि राजकारणात कोणता निर्णय घ्यायचा, असं कमल हसन यांनी सांगितलं.

हेही वाचा : माजी पंतप्रधान पी.व्ही नरसिंहराव यांच्या पुतळा अनावरणास राज्यपालांचा नकार ?; विधानसभेत काँग्रेसचा आरोप

कमल हसन यांनी २०१८ साली मक्कल निधी मय्यम ( एमएनएम ) पक्षाची स्थापना केली. मात्र, कोणत्याही पक्षाशी युती न करता ‘एकला चलो रे’चा नारा त्यांनी दिला होता. पण, त्यांच्या पक्षात फूट पडली आहे. कारण, अनेक प्रमुख नेत्यांनी पक्षाला ‘रामराम’ ठोकला आहे. त्यानंतर आता कमल हसन आपल्या ‘एकला चलो रे’च्या धोरणापासून दूर जात काँग्रेसच्या जवळत आहेत.

तामिळानडूच्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी सांगितलं की, कमल हसन हे यात्रेत सहभागी होणार दुसरे प्रसिद्ध नेता आहे. मागच्या महिन्यात ‘एमडीएम’चे संस्थापक वाइको यांचा मुलगा दुरई वाइको हे सहभागी झाली होते. हैदराबादमध्ये दुरई वाइको हे राहुल गांधींबरोबर ३० मिनीट पायी चालले. कमल हसन राहुल गांधींच्या यात्रेत सहभागी झाले तर आणखी एक पक्ष त्यांच्या युतीत सहभागी होऊ शकतो, अशी शक्यता ‘डीएमके’च्या एका नेत्याने व्यक्त केली आहे.

हेही वाचा : ‘दारू पियोगे तो मरोगे’, नितीशकुमारांच्या विधानानंतर सुशीलकुमार मोदींची जोरदार टीका; म्हणाले, “मुख्यमंत्रीपदाचा…”

तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम ( डीएमके ), काँग्रेस, ‘एमडीएम’ यांची युती आहे. यापूर्वी ‘डीएमके’ ‘एमएनएम’बरोबर काम करण्यास तयार नव्हती. पण, आता त्यांच्यातील युतीत होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. तसेच, हसन यांच्यावर पक्षांतर्गत दबावाचा देखील सामना करावा लागला आहे. कारण, २०२१ साली झालेल्या निवडणुकीनंतर ‘एमएनएम’मधील पराभवाचा सामना करावा लागलेल्या प्रमुख नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. तसेच, अनेक नेत्यांची कमल हसल यांच्या ‘एकला चलो रे’च्या धोरणावर टीका करत पक्ष सोडला होता.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kamal haasan join rahul yatra decks cleared for dmk get new ally ssa