मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे राज्याचे प्रभारी विजयी झाले तर भाजपचे प्रभारी पराभूत झाले. गडग मतदारसंघातून राज्याचे काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील हे १५ हजार मतांनी विजयी झाले. भाजपचे राज्याचे प्रभारी सी टी. रवी हे चिकमंगळूर मतदारसंघातून सुमारे सहा हजार मतांनी पराभूत झाले.

हेही वाचा >>> Karnataka : भाजपाच्या पराभवामुळे मुख्यमंत्री असलेल्या बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाचा अस्त?

पाटील आणि रवी हे दोघेही कर्नाटकातील ज्येष्ठ नेते आहेत. पाटील यांनी यापू्र्वी काँग्रेस मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषविले होते. त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळू शकते. रवी हे यापूर्वी तिनदा निवडून आले होते. या वेळी मात्र ते पराभूत झाले. रवी यांनीही मंत्रिपद भूषविले होते. पाटील यांनी यापूर्वी मंत्रिपद भूषविले आहे. त्यांना पुन्हा मंत्रिपदाचे वेध लागले आहेत.