गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला केवळ दोन दिवस बाकी आहेत. असे असताना येथे भाजपा, आप पक्षांकडून जोमात प्रचार केला जात आहे. तर काँग्रेसचे नेतेदेखील तेवढ्याच क्षमतेने निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.दरम्यान, एकीकडे सर्वच पक्ष प्रचारात गुंतलेले असताना काँग्रेसचे अध्यक्ष मलिल्कार्जुन खरगे यांनी केलेले विधान वादाचा विषय ठरत आहे. येथे एका सभेला संबोधित करताना खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रावणाशी तुलना केली आहे. याच कारणामुळे भाजपानेही काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा धारण केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> भारत जोडो यात्रे’त झळकला राहुल गांधींचा ‘जबरा फॅन’, ११ वर्षांपासून चालतोय अनवाणी पायांनी!

मल्लिकार्जुन खरगे नेमकं काय म्हणाले?

मलिल्काकर्जुन खरगे सोमवारी अहमदाबादमधील बेहरामपुरा येथे एका सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपावर सडकून टीका केली. यावेळी खरगे यांनी मोदी यांची रावणाशी तुलना केली आहे. “भाजपा सगळीकडे नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचा वापर करते. स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकामध्ये मोदींच्या प्रतिमेचा वापर केला जातो. आम्ही तुमचा चेहरा कितीवेळा पाहावा. मोदी १०० डोकी असलेले रावण आहेत का?” असे खरगे म्हणाले.

हेही वाचा >>‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटावरील नव्या वादात जितेंद्र आव्हाड यांची उडी, म्हणाले “मुस्लीमविरोधी काश्मीर फाईल्स…”

दरम्यान, खरगे यांच्या या विधानानंतर भाजपाने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. “काँग्रेसच्या अध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रावण म्हटलेलं आहे. मुळचे गुजरातचे असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी वापरलेले हे शब्द योग्य नाहीयेत. हे विधान निषेधार्ह असून यातून काँग्रेसची मानसिकता दिसते. हा फक्त मोदी यांचाच नव्हे, तर प्रत्येक गुजराती नागरिकाचा अपमान आहे,” असे भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mallikarjun kharge compare narendra modi to arvind sambit patra criticize prd